Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बसस्थानकासमोर रॅली, मेळावे फ्लेक्ससाठी परवानगी देऊ नका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बसस्थानकासमोर रॅली, मेळावे फ्लेक्ससाठी परवानगी देऊ नका

admin
Last updated: 2025/04/09 at 5:02 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अहिल्यानगर 9 एप्रिल (हिं.स.) :- महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरांमध्ये साकारलेले हायटेक बस स्थानक हे महाराष्ट्रात लक्षवेधी ठरले आहे.अत्याधुनिक व सर्व सुविधा नियुक्त असलेले हे बस स्थानक एअरपोर्ट म्हणून लौकिक पावला असून सध्या फ्लेक्स बाजी,मेळावे,रॅली यामुळे या परिसरा मध्ये गोंधळ होत आहे.याचा परिणाम व्यापारावर होत असून तातडीने या परिसरातील फ्लेक्स बाजी थांबून रॅली, मेळावे व मिरवणुकांसाठी या भागांमध्ये परवानगी देऊ नये अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

संगमनेर बस स्थानक गाडी धारकांचे व्यापारी संकुल सहकारी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,एकनाथ शिंदे ,परिवहन मंत्री, पालकमंत्री, माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,आमदार सत्यजित तांबे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बस स्थानकातील व्यापारी संकुलातील गाळे हे बीओटी तत्त्वावर असून व्यावसायिकां नी ते घेतले आहेत.मात्र अलीकडच्या काळात दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असून अनेक प्रकारची फ्लेक्स लावली जात आहे

.त्यामुळे दुकानांचा दर्शनी भाग झाकला जातो .याचबरोबर विनापरवानगी चे डीजे,गर्दी ,आणि विविध फ्लेक्स यामुळे आमच्या रोजीरोटी वर मोठा परिणाम होत आहे.व्यवसाय मंदावला आहे.तरी शासनाच्या आदेशान्वये संगमनेर बस स्थानकासमोरील व्यापारी संकुला तील बीओटी तत्त्वावरील गाळ्यांसमोरील वाहन तळावर कोणत्याही शासकीय,निमशासकीय,शालेय,राजकीय अथवा खाजगी संस्थांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये.याचबरो बर या परिसरामध्ये विनापरवानगीचे खूप फ्लेक्स लावले जात आहेत. ते तातडीने काढण्यात यावे अशी मागणी ही निवेदनाद्वारे या व्यापारी संकुलन संस्थेने केली आहे.

बस स्थानक परिसरामध्ये होणारी फ्लेक्स बाजी आणि विना परवानगी चे कार्यक्रम याबाबत संगमनेर मधील नागरिकां नीही नाराजी दर्शवली आहे.संगमनेर हायटेक बसस्थानक हे अत्यंत अत्याधुनिक असून काही कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजी केली.यावेळेस 2021 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः थांबून सर्व स्वतःचे फ्लेक्स काढले होते. तसेच कार्यकर्त्यांना ही सूचना होत्या की या परिसरामध्ये फ्लेक्स लावू नये जेणेकरून बसस्थानक हे सुंदर दिसेल. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे हे दिशादर्शक काम आहे. मात्र संगमनेरच्या या समृद्ध राजकीय परंपरांना हरताळ फासला जात असून अनेक जण विनापरवाना मोठमोठाले फिक्स लावत आहेत. या विरुद्ध नागरिकांनी तक्रार केली आहे. तालुक्यातही फ्लेक्स बाजी थांबली पाहिजे अशी तमाम नागरिकांची मागणी असून नाशिक- पुणे हायवेवर घुलेवाडी शिवारात चार महिन्या पूर्वीचे काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स ही अजून तसेच लोंबकळत आहे. त्याकडे संबंधित विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निळवंडे – करुले सोसायटीवर थोरात गटाचे वर्चस्व
Next Article सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?