पुणे, 12 एप्रिल (हिं.स.) भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या २२४३ कोटी रूपयांच्या देणग्या लोकशाही राज्यव्यवस्थेला घातक असल्याची टीका आम आदमी पार्टीने (आप) केली. त्या तुलनेत अन्य राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या लहानशा असून त्यामुळेच यापुढील सर्व निवडणुका पैशांच्या बळावरच होतील अशी भीती आप ने व्यक्त केली.
पक्षाचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले की कोणत्याही राजकीय पक्षाला २० हजार रूपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली की त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. ही माहिती एडीआर या संस्थेने नुकतीच प्रकाशित केली. त्यानुसार भाजपला सन २०२३-२४ या वर्षात २२४३ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेसला याच काळात २८१ कोटी रूपयांच्या तर आप ला फक्त ११ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या.