अमरावती, 3 मे (हिं.स.) भाजप चे नेते डॉ किरीट सोमय्या यांनी आज अचलपुर पोलीस स्टेशन ला भेट देत तत्कालीन अचलपुर येथील नायब तहसीलदार यांना अधिकार नसताना स्वतः न्यायाधीश बनत बांगलादेशी नां 324 जन्म दाखले दिले त्या अधिकाऱ्यावर येत्या 7 दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अचलपुर पोलीस स्टेशन ला प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे .
प्राप्त माहितीनुसार अचलपुर तहसील कार्यालयामार्फत 324 बोगस जन्म दाखले दिल्या गेल्याचे प्रकरण मार्च महिन्यात डॉ . किरीट सोमय्या यांनी उघडीस आणले होते त्याचे सर्व दस्तावेज तहसीलदार अचलपूर व जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले होते तरी देखील अजून पर्यंत ते दाखले परत मागितले नाही व त्या नायब तहसीलदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाने केली नाही त्यामुळे आज अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष भेट त्या संबंधित नायब तहसीलदारावर सात दिवसाच्या आत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अचलपुर पोलीस स्टेशन यांनी केली आहे .
यानंतर भाजप पक्षाचे जेष्ठ नेते व माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी अचलपूर तहसील कार्यालय येथे उप विभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांच्याशी या प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली . तहसील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या यांनी सांगितले की आज २ मे रोजी अचलपूर पोलीस स्टेशन येथे २ तक्रारी दिल्या आहे . त्यामध्ये एक अचलपूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारांनी स्वतः तोतया न्यायाधीश होत त्यांना कोणतेही अधिकार नसताना 324 जन्माचे दाखले दिले तसेच दूसरे म्हणजे अचलपुर तहसील कार्यालय येथे अनेकना बोगस जन्म दाखल्या प्रकरणी तहसीलदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ची मागणी त्यांनी अचलपूर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोश खांडेकर यांच्या कडे केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली .