मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. आता प्रोजेक्टवर प्रत्यक्ष काम सुरू झालेय. चेहऱ्यावर रंग लावतानाचे काही फोटो कंगनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. कंगना इंदिरा गांधी बनण्याची तयारी करत आहे. कंगना लवकरच एका पॉलिटिकल ड्रामात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचीच ही तयारी आहे. त्याचेच फोटो तिने शेअर केलेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408639461282353158?s=19
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र यावेळी आगामी चित्रपटामुळे कंगना चर्चेत आहे. सोशल मिडिया ‘कु’ प्लॅटफॉर्मवर कंगनाने या चित्रपटाची माहिती दिली असून ती यात भारताच्या माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे कंगना या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणूनही काम करणार आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार तिच्या सारखे चांगले दिग्दर्शन कुणी करू शकत नाही. यापूर्वी कंगनाने मणीकर्णिका, क्वीन ऑफ झाशी यात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारताना दिग्दर्शन सुद्धा केले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409058963061051392?s=19
इंदिरा गांधी यांच्यावरील आगामी चित्रपटाबाबत ती म्हणते हा चित्रपट इंदिरा गांधी यांची बायोपिक नाही.
चित्रपटाचे नाम ‘इमर्जन्सी ‘ आहे. गेले वर्षभर कंगना या चित्रपटासाठी तयारी करते आहे आणि या चित्रपटासाठी तिने अनेक चांगले चित्रपट हातचे सोडले आहेत. या चित्रपटाचे लेखन रितेश शहा करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्या सारखे दिसण्यासाठी कंगनाने बॉडी स्कॅन करून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंगनाचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित थलावई ची हिंदी आवृत्ती लवकरच रिलीज होणार आहे.माझ्याशिवाय आणीबाणीचा काळ कोणाला कळू शकत नाही, माझ्याशिवाय आणीबाणी उत्तमरित्या कोणीच दिग्दर्शित करू शकणार नाही, असे म्हणत कंगना तिच्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेतली आहे.
या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असणार असून भारतीय राजकारणातील एका प्रतिष्ठित नेत्याची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक असल्याचे कंगनाने सांगितले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1408398707700031493?s=19
दरम्यान, हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित आहे. परंतु ते कोणत्या पुस्तकावर आधारित आहे, याच्या खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. या चित्रपटाची पटकथा साई कबीर यांनी लिहिली आहे.