Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाच्या भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी सोडली मुंबई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

कोरोनाच्या भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी सोडली मुंबई

Surajya Digital
Last updated: 2021/05/11 at 9:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, पण मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक जण मुंबई सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेले आहे. मात्र हृतिक रोशन जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

काळ्या बुरशीजन्य म्युकोरोमायकॉसिस नावाच्या आजाराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अधिक माहिती देताना #surajyadigital #आजार #आरोग्यमंत्री #बुरशीजन्य #सुराज्यडिजिटल #माहिती #informationhttps://t.co/8JjtTDyoIu

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

मुंबईत कोरोना विषाणूचा कहर काहीसा कमी झाला असला तरी मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व गोष्टींची कमतरता भासत आहे. अशा काळात सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड मंडळींपर्यंत ज्यांची इतर ठिकाणी राहण्याची सोय आहे, असे अनेकजण मुंबई सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत.

मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर https://t.co/gO2c6h2fw4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याची माहिती समोर आली आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे. हृतिक रोशनच्या कुटुंबातील सदस्य फार्महाऊसमध्ये राहायला गेले असले तरी सध्या हृतिक रोशन मात्र जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. हृतिकचे कुटुंब काही आवश्यक वस्तू घेऊन फार्महाऊसमध्ये राहायला गेले आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन हे फक्त मुंबईत महत्त्वाची बैठक किंवा इतर कोणते महत्त्वाचे काम असल्यासच येतात, असे सांगण्यात येत आहे.

नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी, ट्वीट केलेला पहा व्हिडिओ https://t.co/64OEngLYvU

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

नुकतेच राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी त्यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी राकेश आणि पिंकीने वधू-वरांसारखे कपडे घातले होते. पिंकी यांनी मेंहदीही लावली होती आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. राकेश रोशन आणि पिंकी रोशन एकमेकांवर खूप प्रेम करतात. आयुष्यात अनेक चढ-उतार आले, परंतु त्यांनी प्रत्येक प्रसंगला हसत-खेळत तोंड दिले. व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपल्या जीवनाचा हा सुंदर प्रवास शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर पिंकी रोशनने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये लिहिले होते ‘दुल्हा आया गया’.

५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला https://t.co/j5oEugViAq

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #HrithikRoshan #parents #leave #Mumbai #Corona, #कोरोनाच्या #भीतीपोटी #हृतिकरोशनच्या #आईवडिलांनी #सोडली #मुंबई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर
Next Article आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?