Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतात पडला ३०० फूट खोल प्रचंड मोठा खड्डा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवार

शेतात पडला ३०० फूट खोल प्रचंड मोठा खड्डा

Surajya Digital
Last updated: 2021/06/05 at 5:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मेक्सिको : मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुएब्ला राज्यात एक जागा आहे सांता मारिया झॅकटेपेक. या गावात शेतकरी शेती करून पोट भरतात. त्यादरम्यान, त्यांच्या शेतात एक प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. खड्डा सुमारे ३०० फूट खोल आणि तो ७० हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा हा खड्डा १५ फुटांचा होता, पण नंतर झपाट्याने वाढत गेला.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401026108418523140?s=19

शेतात पडलेले खड्डे तुम्ही पहिले असतील, पण शेतातला हा खड्डा अचानक मोठा मोठा होत गेला तर काय होईल? तर तिथे एक सिंकहोल म्हणजेच भगदाड तयार होईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशी भगदाडे पडण्याच्या घटना काही नव्या नाहीत. पृथ्वीच्या आतील थर ठिसूळ किंवा मऊ झाले की जमिनीत अपोआप अशी खोल खोल विवरे तयार होतात. जमिनीत जेव्हा अशी मोठमोठी भगदाडे पडणार असतात त्याआधी क्वचितच कधीकधी जमिनीला दूरवर भेगा पडणे, त्या परिसरातील झाडे, इमारती एका बाजूला झुकणे, इमारतींनाही मोठमोठ्या भेगा पडणे, असे काही संकेत मिळतात. तर कधीकधी ही मोठाली भगदाडे अचानकच तयार होत जातात.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401101617613602818?s=19

पुएब्ला राज्याचे गव्हर्नर मिगुएल बार्बोसा हुयर्टा म्हणाले की, सांता मारिया झॅकटेपेक शहरात असलेले खड्डा २० मीटर खोल आहे. हा खड्डा सातत्याने वाढत असल्याने जवळपासची घरेदेखील धोक्यात आली आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अधिकृत माहितीनुसार, खड्ड्याजवळ राहणारे कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलं आहे. लोकांना या खड्ड्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आतापर्यंत यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

मेक्सिको रीजनचे पर्यावरण सचिव बिएट्रीज मॅन्रिक यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा खड्डा पहिल्यांदा तयार झाला तेव्हा त्याची त्रिज्या केवळ १५ फूट होती, परंतु काही तासांतच ती झपाट्याने पसरू लागली. जमीन भूसभुसीत असल्याने असे होत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जल आयोगासह सार्वजनिक संस्थाचे अधिकारी मातीचे नमुने संकलित करून तपासणी करणार आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1401128384411799558?s=19

जरी या कामासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार असला, तरी हा खड्डा सतत वाढत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, खड्ड्याच्या शेजारी राहणा-या एका व्यक्तीने सांगितले की तो वादळाच्या आवाजासाठी जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याने हा खड्डा पाहिला. त्यामध्ये पाण्याचे फुगे दिसत होते. त्यांना खूप भीती वाटली. त्यांचे घरही खड्ड्यात आले आहे याची त्यांनाही खंत आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #huge #pit300feet #deepfell #field, #शेतात #पडला #३००फूट #खोलप्रचंड #मोठाखड्डा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार
Next Article व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर बंद? अखेरची नोटीस

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?