Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नेहा कक्करला हा आजार सतावतोय, केली प्रसिद्ध कलाकाराला पाच लाखांची मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

नेहा कक्करला हा आजार सतावतोय, केली प्रसिद्ध कलाकाराला पाच लाखांची मदत

Surajya Digital
Last updated: 2021/02/21 at 3:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : प्रसिध्द गायिका नेहा कक्करला थायरॉईड हा आजार आहे. याचा त्रासही तिला होत आहे. याचा खुलासा तिनेच केला आहे. ‘मी जीवनात खूप खूश आहे. करियरला चांगले दिवस आले आहेत. कुटुंबही चांगले आहे . पण थायरॉईड हा आजार खूप सतावत आहे. यामुळे एंग्जायटीचा त्रास होतो. भर स्टेजवर शरीर कधी कधी थरथर कापते’, असे नेहाने ‘इंडियन आइडल’च्या एका एपिसोडमध्ये सांगितले. नेहा ‘इंडियन आइडल’ शोमध्ये जज म्हणून काम करत आहे.

बॉलिवूड गायिका नेहा कक्करने नुकत्याच आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली आहे. एका रिऍलिटी शोच्या मंचावर भावूक होत नेहा कक्करने ही खास बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नेहा कक्करने आपल्याकडे प्रेम, चांगले कुटुंबीय, करिअर असं सगळं काही असताना एक खंत व्यक्त केली आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असल्यामुळे त्याचा त्रास होत आहे. ‘इंडियन आयडल’ च्या मंचावर भावूक होत नेहाने ही खास बाब शेअर केली आहे.

नेहा कक्करने या दिवसांत गाण्याच्या लोकप्रिय रिऍलिटी शो असलेल्या ‘इंडियन आयडल 12 मध्ये जजची भूमिका साकारत आहे. या आठवड्यात आईवर स्पेशल एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. चंदीगडमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ गाणं गायलं.

नेहा कक्कर हे गाणं ऐकून इमोशनल झाली आणि रडू लागली. गाणं ऐकून नेहा रडू लागली तेव्हा तिने सांगितलं की, अनुष्का प्रमाणे मलापण एंक्झायटीचा त्रास आहे.

नेहाच्या आजारपणाबद्दल ऐकल्यावर तिचे चाहते दुःखी झाले आहेत. नेहाने आपलं करिअर देखील एका रिऍलिटी शोमधूनच सुरू केलं आहे.

* प्रसिध्द कलाकारावर संकट, नेहा कक्कर रडली; केली 5 लाखांची मदत

‘इंडियन आइडल’च्या एका शोमध्ये ‘जिंदगी की ना टूटे लडी’, ‘एक प्यार का नगमा है’ आणि ‘मैं ना भूलूंगा’ या गाण्याचे प्रसिध्द गीतकार संतोष आनंद यांनी हजेरी लावली. पत्नी, मुलगा आणि सुनेच्या आत्महत्येनंतर संतोष आनंद एकटे पडले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या खूप हलाखीची झाली आहे. त्यांचे हे हाल पाहून गायिका नेहा कक्करला रडू कोसळले. दरम्यान, यावेळी नेहाने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Singer #NehaKakkar #suffering #fromthisdisease, #नेहाकक्करला #आजार #सतावतोय #प्रसिद्धकलाकाराला #पाचलाखांची #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधन दरवाढीवरुन शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
Next Article आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया, सारा आपल्या भावाच्या पाठिशी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?