Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इरफान खानचा अखेरचा चित्रपट आज ओटीटीवर रिलीज होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

इरफान खानचा अखेरचा चित्रपट आज ओटीटीवर रिलीज होणार

Surajya Digital
Last updated: 2021/12/31 at 3:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे गेल्या वर्षी 29 एप्रिलला निधन झाले. आता इरफान खान यांचा ‘मर्डर एट द तीसरी मंझिल 302’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवनीत बाज सैनी यांनी केलं आहे. हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रसारित होणार आहे.

अभिनय, डोळ्यातील इंटेन्स भाव, डायलॉग डीलिव्हरी मधील बाप माणूस म्हणजे इरफान खान अशी ओळख बनली होती. दुर्दैवाने त्याला कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आपल्या कमी कालावधीच्या करियरमध्ये देखील त्यांनी उत्तमोत्तम सिनेमात उत्कृष्ट अभिनय करून आपले स्वतःचे एक वेगळे स्थान चित्रपट सृष्टीत तयार केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही.  अभिनेते इरफान खान यांचे गेल्या वर्षी 29 एप्रिलला निधन झालं. ते आता या जगात नसले तरी त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं लोकांच्या हृदयात आपलं खास असे अढळ स्थान निर्माण केलं. ‘मर्डर एट द तीसरी मंझिल 302’ या चित्रपटातून चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची झलक पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

इरफान खान यांचा हा चित्रपट आज 31 डिसेंबर रोजी OTT  प्लॅटफॉर्म Zee5  वर प्रसारित होणार आहे. इरफान खान यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात लकी अली, दीपल शॉ आणि रणवीर शौरीसारखे स्टार्स दिसणार आहेत.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इरफान खान यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातल्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान इरफान एका मोठ्या दुर्घटनेतून बचावले होते.

#IrrfanKhan's long delayed film #MurderAtTeesriManzil302 finally gets a release!!

Directed by #NavneegBajSaini, the film also stars @luckyali @DeepalShaw and @RanvirShorey.

Premieres Dec 31st on @ZEE5India.@irrfank #Irrfan pic.twitter.com/6RaON6tmK8

— CinemaRare (@CinemaRareIN) December 27, 2021

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

2007 साली, जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. दिग्दर्शक नवनीत थायलंडमधल्या पटाया इथं शूटिंग करत होते. त्याला समुद्राच्या मधोमध गाण्यांचा एक सीक्वन्स शूट करायचा होता. इरफान खान, लकी अली आणि दीपल शॉ नुकतेच बोटीवर बसून समुद्रकिनारी पोहोचले होते. तेव्हा वातावरणही खराब झालं आणि बोटीचं इंजिनही बंद झालं.

दरम्यान, काही वेळ हे लोक परत न आल्यानं समुद्रकिनारी असलेले काही साथीदार घाबरून आले. यानंतर स्थानिक बचाव पथकानं त्यांना बाहेर काढलं आणि सुखरूप किनाऱ्यावर आणलं. त्यावेळी इरफान खान यांच्या सोबत त्यांचा 9 वर्षाचा मुलगा बाबील खान देखील होता. अशी आठवण चित्रपटाच्या मेकर्सनी सांगितली आहे.

इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी दीपक डोबरियाल, किकू शारदा आणि रश्मिका मंदाना यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं होतं. या चित्रपटात करीना कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं होतं.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय इरफान खान ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द लंचबॉक्स’, ‘तलवार’, ‘पान सिंग तोमर’, ‘पिकू’, ‘मकबूल’ आणि ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांसाठी चांगलेच ओळखले जातात.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #IrrfanKhan #lastfilm #released #OTT #today, #इरफानखान #अखेरचा #चित्रपट #ओटीटी #रिलीज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ओळखीचा दुरुपयोग, सोलापुरात दोन अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार
Next Article अकलूजमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी झोपडीत रंगली साखर शाळा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?