Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काबूलमध्ये विमानतळावर गर्दी, पाच जणांचा मृत्यू; टायर पकडून चालले होते लटकत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

काबूलमध्ये विमानतळावर गर्दी, पाच जणांचा मृत्यू; टायर पकडून चालले होते लटकत

Surajya Digital
Last updated: 2021/08/16 at 6:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

काबूल : अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी उसळली आहे. तिथे सुरु असलेल्या गोंधळामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत भयावह स्थिती आहे. विमान पकडण्यासाठी, विमानात प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरक्ष: चेंगराचेंगरी सुरु आहे. तालिबानच्या हाती सत्ता आल्यामुळे लोकं देश सोडून पळत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लष्कर आणि नाटो फौजांनी काढता पाय घेतल्यानंतर हाहाकार उडाला आहे. रक्तपिपासू तालिबान्यांनी महिनाभरात देश काबीज करताना पुन्हा एकदा तालिबानी राजवटीची हाक दिली आहे. देशातील प्रत्येक जीव संकंटात असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांनी देश सोडल्याने संतापाची लाट उसळली आहे. काबूल विमानतळावर देश सोडून अभूतपूर्व गर्दी झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तालिबानने या ठिकाणी ताबा मिळवल्यानंतर लोक देशातून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर धाव घेत आहेत. काही जण विमानाच्या टपावर बसलेले दिसून येत आहेत. त्यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका विमानातून काही लोक खाली पडताना दिसत आहेत. त्यामुळे दहशत पसरली आहे. तर विमानतळावर झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

हमीद करझाई विमानतळावरुन व्यावसायिक, प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळावर लुटमार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काबूल विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द टाळण्यासाठी एअर इंडियाचे शिकागो-दिल्ली विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या दिल्लीला येणाऱ्या या विमानात यूएई किंवा दोहा विमानतळावर इंधन भरण्यात येईल.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Crowd #airport #Kabul #fivekilled #tires #hanging, #काबूल #विमानतळावर #गर्दी #पाचजणांचा #मृत्यू #टायर #पकडून #लटकत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला’, पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर; वाचा मराठा आरक्षणावरही काय म्हणाले ?
Next Article वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून 3 भावंडांना मिळाली 10 हजारांची शिष्यवृत्ती

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?