काबूल : तालिबान आणि पाकिस्तानच्या धोरणाचे कट्टर विरोधक समजले जाणारे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या ताफ्यावर काबूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या बॉम्ब हल्ल्यात उपराष्ट्रपती सालेह थोडक्यात बचावले. मात्र, तीन जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहे.
तीन जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. सालेह आपल्या घरातून कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्ब हल्ला करण्याता आला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीचे तुकडे झाले. शेजाऱ्याच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपराष्ट्रपती सालेह यांच्या मुलाने ट्विट करून म्हटले की, माझे वडील आणि मी सुरक्षित आहोत. आमच्यासोबतची एकही व्यक्ती या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली नाही. सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षीदेखील सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी २० जण ठार झाले होते.
सालेह यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला इतका भीषण होता की, वाहनांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटामुळे काही इमारतींचेही नुकसान झाले आहे.
आजच्या दिवशी १९ वर्षांपूर्वी तालिबानविरोधी नेता अहमद शाह मसूद यांचीदेखील हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यामागे तालिबान आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी गटांचा हात असल्याची चर्चा आहे.
पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या शत्रूंनी सालेह यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वाईट हेतूमध्ये त्यांना यश मिळाले नाही. सालेह या हल्ल्यातून बचावले’ असे अमरुल्लाह सालेह यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.