Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शुभमंगल सावधान! कतरिना- विकी अखेर लग्न बंधनात; कशामुळे गुप्तता ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शुभमंगल सावधान! कतरिना- विकी अखेर लग्न बंधनात; कशामुळे गुप्तता ?

Surajya Digital
Last updated: 2021/12/10 at 8:58 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तयारी अगदी गुप्त ठेवली होती. मात्र कशामुळे इतकी गुप्तता हेच आणखी समजू शकले नाही.

या लग्नसोहळ्यामध्ये कतरिनाने डार्क गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी नेहा कक्कर, हार्डी संधू, रोहनप्रीत ते आरडीबी सारखे स्टार्स देखील या उपस्थित होते.

विकी आणि कतरीनाचं लग्न हिंदू विवाह पद्धतीने झाले आहे. त्याचे काही सुंदर फोटोही समोर आले आहेत. लग्नाच्या आधी विकीने एका खास विंटेज कारमधून एन्ट्री केली.

राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या चौथ का बरवडामध्ये या जोडप्याने एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. अभिनेत्री कतरिना विकी कौशल यांच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आता तो क्षण आला आहे जेव्हा कतरिनाचा ब्राइडल लुक सर्वांसमोर आला आहे. कतरिनाने तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. दोघ देखील खुप सुंदर आणि आनंदात दिसत आहेत.

वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये विकी हॅण्डसम दिसत होता. या जोडीची पहिली झलक पाहायला मिळाल्याने चाहते खूपच खूश आहेत.

लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेरील फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनाने प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी त्याने पाहुण्यांना आपला फोन हॉटेलच्या खोलीत ठेवण्यास आणि फोटो शेअर न करण्यास सांगितले आहे. मात्र, आता लग्नाच्या ठिकाणाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात सुरक्षा कर्मचारी बॅरिकेड्स लावून बाहेर उभे आहेत आणि गेटच्या बाहेर दोन रुग्णवाहिकाही उभ्या असलेल्या दिसत आहेत.

विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत. उद्या दुपारी ते साडेबाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील, मात्र विमानतळाच्या बाहेर न पडता ते थेट मालदीवसाठी निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होती. विकी आणि कतरीना यांच्या लग्नानाला त्यांचा परिवार आणि काही मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. लग्नात काही खास नियमावलीही लावण्यात आली होती.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Goodluck #Katrina #Vicky #finally #marriage #secrecy, #शुभमंगल #सावधान! #कतरिना #विकी #लग्न #बंधनात #गुप्तता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी संपाच्या समर्थनार्थ आंदोलन; आडम मास्तरांसह कार्यकर्त्यांना अटक
Next Article आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?