Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सैन्यानं देश हातात घेतले; राष्ट्रपती – पंतप्रधानांना घेतले ताब्यात, देशात असेही तख्तपलट होऊ शकते
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

सैन्यानं देश हातात घेतले; राष्ट्रपती – पंतप्रधानांना घेतले ताब्यात, देशात असेही तख्तपलट होऊ शकते

Surajya Digital
Last updated: 2020/08/21 at 8:51 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बामाको : माली देशाची राजधानी बामाकोपासून 15 किलोमीटरवर एक बॉम्बस्फोट झाला. अनेक राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर अचानक मालीच्या रस्त्यांवर सैन्य उतरतं. सैन्याच्या असंख्य गाड्या राजधानीच्या दिशेनं निघाल्या. हे दृश्यं पाहून देशात काही तरी मोठं घडतंय, याचा अंदाज मालीच्या जनतेला आला.

मंत्र्यांच्या अटकेनंतर राष्ट्रपती भवनाबाहेर जमलेल्या गर्दीनं जल्लोष केला. विद्रोह करणाऱ्या सैनिकांचा जयजयकार सुरु झाला. अखेर बंदूक कानाला लावून मालीचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या. अशा पद्धतीनं फक्त काही तासात सैन्यानं माली देशात तख्तापलट केला. राजधानीत शिरताच सैन्यानं सरकारी इमारती घेरल्या. मंत्रालयाबाहेर पहारा उभा केला. अनेक मंत्र्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र मंत्र्यांऐवजी विद्रोह करणाऱ्या सैन्याचं खर टार्गेट राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार आणि पंतप्रधान बाऊबो सिसे होते. यांनाही ताब्यात घेतले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सैन्यानं देश हातात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी असंख्य लोक रस्त्यांवर जमू लागले. आनंदाच्या भरात जमलेल्या जमावानं राष्ट्रपतींशी निगडीत एक-एक ठिकाणांवर हल्लाबोल सुरु केला. माली देशातल्या कायदा मंत्रालयाचं कार्यालय पेटवलं गेलं. इमारतीत जे-जे किमती साहित्य होतं, ते सर्व लुटून लोकांनी घरी नेलं. मालीच्या राष्ट्रपतींच्या मुलाचा महलवर सध्या जनतेनं कब्जा केला आहे. राष्ट्रपतींच्या मुलाच्या स्विमिंग पूलमध्ये सामान्यांची मुलं पोहतायत. राष्ट्रपतींच्या मुलाचा शाही महलसुद्धा पब्लिक प्रॉपर्टी झाला आहे.

तख्तापलटानंतर खुद्द राष्ट्रपती संध्याकाळी टीव्हीवर आले. टीव्हीवरच त्यांनी स्वतःच्या राजीनाम्याची घोषणा केली. जर सैन्यानंच सरकारविरोधात बंदूक उचलली असेल, तर राजीनाम्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं सांगून त्यांनी संसद भंग करण्याचंही सुतोवाच केलं. दुसरीकडे देश ताब्यात घेण्याचा आरोप मालीच्या सैन्यानं फेटाळलाय. सैन्याच्या दाव्यानुसार भ्रष्ट सरकार घालवून लवकरच देशात पुन्हा निवडणुका होतील.

माली देशात इस्लामिक कट्टरपंथी आणि सैन्य, यांच्यातला संघर्ष तसा जुना आहे. 2012 पासून तिथं या दोघांमध्ये खटके उडतायत. मालीच्या तख्तापालटामागे वर-वर भ्रष्टाचाराचं कारण वाटत आहे. मात्र अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार मालीचं तख्तापलट, हे चीनचं कपट आहे.

अफ्रिकन देशांमध्ये चीननं गुंतवणुकीद्वारे पाण्यासारखा पैसा ओतलाय. त्यात मालीसुद्धा आहे. शांतीसेनेच्या आडून चीननंच मालीच्या सैन्याशी जवळीक केली. म्हणून सैन्याच्या या बंडाला चीनचीच फूस असल्याचं बोललं जातंय. मालीमध्ये चीनच्या असंख्य कंपन्या आहेत. तिथं उत्पादनाच्या आडून चीनचा विस्तारवादी ड्रॅगन पाय पसरतोय.

* मात्र, हे सगळं घडलं कशामुळे?

माली देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सैनिकांची पगार कपात, या दोन गोष्टी तख्तापलटाला कारणीभूत ठरल्या. सैन्यानं या दोन्ही मुद्द्यांवर आधीपासून सीनियर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अटक केली गेली.

2012 नंतर माली देशातलं हे दुसरं तख्तापलट आहे. मात्र पहिल्या तख्तापलटानंतरसुद्धा माली देशातली स्थिती सुधारली नाही. याशिवाय भविष्यातही ती सुधारण्याची शक्यता कमी आहे. कारण मालीच्या सैन्यात चीनने स्वतःचे कमांडर पेरुन ठेवले आहेत.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #मालीदेश #सैन्य #ताब्यात #तख्तपलट #राष्ट्रपती #पंतप्रधान #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्या गणरायांचे आगमन: दुपारी दोनपर्यंत घरचा गणपती स्थापन करा; बुधवारी गौरीपूजन
Next Article संशय वाढला : महेश भट्टसोबतची रियाचे चॅटिंग आले समोर; सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?