Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मी वाईट नाही, पण आर्थिक संकटात आहे; पैसे थकवल्याच्या आरोपानंतर मंदार…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

मी वाईट नाही, पण आर्थिक संकटात आहे; पैसे थकवल्याच्या आरोपानंतर मंदार…

Surajya Digital
Last updated: 2021/02/22 at 8:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : ‘हे मन बावरे’ या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मंदार म्हणाले, की ‘ मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे. मी वाईट माणूस नाही. पण मी अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे. मला खूप लॉस झाला आहे. पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट. फक्त मला थोडा वेळ हवा आहे’.

मराठी मालिका विश्वात दबदबा असलेले प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मीसुद्धा बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, असं स्पष्टीकरण देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.

2000 मध्ये त्यावेळच्या अल्फा मराठीवर गाजलेल्या ‘आभाळमाया’ मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं होतं. ‘बोक्या सातबंडे’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘जिवलगा’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’, ’गुलमोहर’, ‘हे मन बावरे’ अशा एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे. त्यानंतर देवस्थळींनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.

* मंदारची फेसबुक पोस्ट?

“नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो” असं मंदार देवस्थळी यांनी लिहिलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतं! प्लीज घाबरु नका, बोला.. please support & Pray for US.. #support # चळवळ” असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होती. शशांक केतकरने साकारलेल्या सिद्धार्थच्या बहिणीची म्हणजेच संयोगिताची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. शर्मिष्ठा राऊत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्रीने सहभागी झाली होती. तिने अंतिम फेरीपर्यंत मजलही मारली होती. शर्मिष्ठाची भूमिका असलेल्या मन उधाण वाऱ्याचे, उंच माझा झोका, सुखाच्या सरींनी हे मन बावरे यासारख्या मालिका गाजल्या आहेत. शर्मिष्ठा लॉकडाऊनच्या काळात विवाहबंधनात अडकली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #MandarDevasthali #clarification #MarathiActress #claims #stoppedpayment, #मराठीविश्व #मंदारदेवस्थळी #शर्मिष्ठाराऊत #पैसे #थकवल्याचा #आरोप #पोस्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोनिया गांधींच्या जावईचा ‘सायकलसवारी’ करुन इंधनदरवाढीचा निषेध
Next Article विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यास राजभवनातून राज्यपालांचा अॉनलाईन सहभाग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?