मुंबई : फोटोतील हा चेहरा जरा निरखून पाहा… कारण ही अभिनेत्री नाही तर स्त्री वेशात एक अभिनेता आहे. त्याचे नाव काय तर स्वप्निल जोशी. होय, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो क्षणात व्हायरल झाला. या फोटोमध्ये स्वप्निल स्त्री वेशात दिसत आहे. त्याने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. आता हा स्त्री वेश कशासाठी तर ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत.
‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेत स्वप्निल जोशी एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येत असतो. स्वप्नील सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो सतत आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल फॅन्सला सांगत राहतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, स्वप्नील जोशी याने नुकतंच आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा लूक अनेकांना संभ्रमात पडणारा असून, अवघ्या काही तासांतच त्याचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये स्वप्निल स्त्री वेशात दिसत आहे. त्याने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. आता हा स्त्री वेश कशासाठी तर ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत.
‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेत स्वप्निल जोशी एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता. या मालिकेत स्वप्नीलने स्त्री पात्र साकारले होते. या भूमिकेची आठवण त्याने यावेळी शेअर केली.
स्वप्नीलने या फोटोला एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. ‘तेरे घरच्या समोर’ ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव मला समृद्ध करून गेलाय. स्त्री भूमिका साकारणं, ‘ती’ होणं खरंच सोपं नाही. ‘ती’ जखमांच गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अश्या प्रत्येक ‘ती’च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे.’
* थोडक्यात स्वप्निलविषयी
स्वप्निलने वयाच्या ९ व्या वर्षी रामायण मालिकेत कुशची भूमिका साकारली आणि तिथेच त्याच्या करिअरची गाडी सुरू झाली ती आजपर्यंत. रामायणातील कुशनंतर अमानत, हद्द कर दी, भाभी, तेरे घरच्या समोर अशा अनेक मालिका तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार अशा चित्रपटांत त्याने विविध भूमिका साकारल्या. पण त्याला खरा ब्रेक मिळाला तो अधुरी एक कहाणी या मालिकेतील मुख्य भूमिकेनंतर. त्या मालिकेतून मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला एक नवा चेहरा सापडला आणि त्यानंतर चेकमेट, आम्ही सातपुते, मुंबई-पुणे-मुंबई, दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोअर, पोरबाजार, प्यारवाली लव्ह स्टोरी, वेलकम जिंदगी, मितवा, तू हि रे असे एक से बढकर एक चित्रपट त्याने दिले.