मुंबई : बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची आई स्नेहलता पांडे यांचं आज (शनिवार) निधन झालं. बॉलिवूडमधील कलाकारांनी चंकी पांडे यांचं सांत्वन करत स्नेहलता पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, आईच्या निधनानंतर चंकी पांडे यांच्यासह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. स्नेहलता पांडे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर चंकी पांडे आणि भावना पांडे हे दोघेही स्नेहलता पांडे यांच्या वांद्रे येथील घरी पोहोचले.
#chunkypanday mother late #snehlatapanday ji last rites may her Soul rest in peace 💔🙏 Om Shanti @viralbhayani77 pic.twitter.com/2fTvh4z7WZ
— Viral Bhayani (@viralbhayani77) July 10, 2021
चंकी पांडे पत्नी भावना आणि मुलगी रायसा, अनन्या पांडेसह आपल्या आईच्या घरी पोहोचले आहेत. चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेला आजीचा खूप लळा होता. महिला दिनादिवशी हा लळा दिसून आला. त्या दिवशी अनन्याने आपल्या आजीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात आपल्या आयुष्यावर झालेल्या त्यांच्या प्रभावाबाबत तिने सांगितले होते. सन २०१९ मध्ये अनन्याने आपली आजी स्नेहलताच्या वाढदिवशी एक गोड व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिची आजी ‘जवानी’ गाण्यावर डान्स करताना दिसली. त्याकाळी हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या आजीला गमावल्यानंतर अनन्या खूपच भावुक झाली आहे. ती खूप रडतानाही दिसली. स्नेहलता पांडे यांच्या अंतिम दर्शनासाठी नीलम कोठारी, समीर सोनी, शबीना खान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण, बाबा सिद्दीकीसह अनेक कलाकारांची स्नेहलता यांच्या घराबाहेर उपस्थिती होती.
#AnanyaPanday, #ChunkyPanday and #BhavanaPandey clicked arriving for #SnehlataPandey’s (Chunky’s mother) last rites. pic.twitter.com/rC0GK8Fr65
— Filmfare (@filmfare) July 10, 2021
बॉलिवूडवर एकापाठोपाठ एक दु:खाचा डोंगर कोसळत आहे. या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांवर शोककळा पसरली आहे. चंकी पांडे यांच्या आईचे निधन कोणत्या कारणांमुळे झाले, हे समजले नाही. तरीही स्नेहलता यांच्या निधनाची बातमी मिळताच, बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. अनेक कलाकारांना स्नेहलता यांच्या वांद्रे येथील घरी दिसून आले.