Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नॅशनल क्रश रश्मिकाची ‘मिशन मजनू’तून बॉलिवूडमध्ये एंट्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

नॅशनल क्रश रश्मिकाची ‘मिशन मजनू’तून बॉलिवूडमध्ये एंट्री

Surajya Digital
Last updated: 2021/03/06 at 11:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई :  साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. बॉलिवूड अभिनेता सिध्दार्थ कपूरच्या ‘मिशन मजनू’ चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. नॅशनल क्रश रश्मिका सिद्धार्थसोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊला रवाना झाली. शूटिंग ठिकाणी पोहोचताच रश्मिकाने इन्स्टावर आपले फोटो शेअर केले आहेत. ‘मिशन मजनू’मध्ये सिद्धार्थ रॉ एजेंटची भूमिका साकारणार आहे. शांतनु बागची या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

जगभरातील तरुणांची धडकन बनलेली आणि ‘नॅशनल क्रश’ असलेली साऊथ इंडस्ट्रीची प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना ‘मिशन ‘मजनू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ यांसारख्या गाजलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिकाच्या या पहिल्याच हिंदी चित्रपटाचे नाव ‘मिशन मजनू’ असे आहे. रश्मिकाने या सिनेमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात केली असून तिने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रश्मिकासोबत या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत काम करताना दिसणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मागील काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ‘मिशन मजनू पहिला दिवस’..! अशा शब्दांमधये तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शूटिंगसाठी क्लॅप करताना दिसत आहे. या पोस्टसोबत तिने चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना ही टॅग केले आहे.

बॉलिवूडचा ‘हॅंडसम हंक’ अशी ओळख असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. रश्मिका काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता मुंबईमध्ये दाखल झाली होती. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. हा एक स्पाय थ्रिलर सिनेमा असणार आहे. आता या चित्रपटात रश्मिका कोणत्या भूमिकेत दिसणार ? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

* वर्षाच्या शेवटी चित्रपट प्रदर्शित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिकाने सिद्धार्थसोबत लखनौमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. शंतनू बागची यांचे दिग्दर्शन असलेला ‘मिशन मजनू’ हा चित्रपट हेरगिरी थ्रिलर चित्रपट आहे. 1970 च्या दशकातील वास्तविक घटनांनी प्रेरित असलेल्या या चित्रपटात भारताच्या महत्वाकांक्षी गुप्त कारवाईवर आधारित कथा यात पाहायला मिळणार आहे. परवीज शेख, असीम अरोरा आणि सुमित बथेजा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ आणि मुंबईत होणार आहे. या वर्षाच्या शेवटी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #NationalCrush #rashmika #mishanmajanu #bollywood #entry, #नॅशनलक्रश #रश्मिकाची #मिशनमजनू' #बॉलिवूडमध्ये #एंट्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन, अर्धशतकाहून अधिक काळ गाजवला
Next Article अबब! हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?