छत्रपती संभाजीनगर, 1 एप्रिल (हिं.स.)।
संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी आणि सीडीएस ही परीक्षा रविवार 13 एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षांसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर 4447 उमेदवार प्रविष्ठ होणार आहेत, अशी माहिती जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड यांनी दिली आहे.
संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत जिल्हा केंद्रावर रविवार 13 एप्रिल रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी (एन. डी.ए.)आणि सीडीएस परीक्षा 2025 होणार आहे.
एनडीए परीक्षा एकूण 12 उपकेंद्रावर होईल. ह्या परीक्षेचे पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी साडेबारा तर दुसरे सत्र दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत असेल.
सीडीएस परीक्षा एकूण 2 केंद्रांवर व तीन सत्रात होईल. पहिले सत्र सकाळी 9 ते 11 वा. पर्यंत व दुसरे सत्र दुपारी 12 ते दुपारी 2 वा. पर्यंत तर तिसरे सत्र दुपारी 4 ते सायं.6 वाजेपर्यंत होईल. एकूण 14 उपकेंद्रावर या दोन्ही परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण 4447 उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आला आहे.
परीक्षेसंदर्भात संघ लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सुचना …
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने प्रवेशपत्र व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड या प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकीत प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये पेपर सुरु होण्याच्या एक तास अगोदर प्रवेश देण्यात येईल.परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत, मास्क, पारदर्शक सॅनिटायझर बॉटल या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नाही.
उमेदवारांना डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षात नेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य सोबत आणल्यास उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. महिला उमेदवारांकरीता महिला पोलिसांमार्फत तपासणी करण्यात येईल. आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र हे त्यांच्यासाठी प्रवेशाचा पास म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्या पुराव्याकरीता आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक पुरावा जवळ बाळगणे व तसे तपासणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहिल, असे जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांनी कळविले आहे.
परीक्षा केंद्र याप्रमाणे :
1. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस, सायन्स बिल्डींग, रोझा बाग हर्सुल रोड – 277
2. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस टॉम पॅट्रीक बिल्डींग, सायन्स बिल्डींग, रोझा बाग हर्सुल रोड – 338
3. शासकीय कला व विज्ञान महविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊस जवळ किलेअर्क, लेबर कॉलनी -384
4. डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा, ज्युबली पार्क – 384
5. सरस्वती भुवन, मुलांची शाळा, सरस्वती कॉलनी औरंगपुरा – 384
6. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय, समर्थ नगर – 288
7. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर -288
8. शिशु विहार हायस्कूल, महात्मा फुले चौक, औरंगपुरा -288
9. सरस्वती भुवन, कला व वाणिज्य महाविद्यालय, (पार्ट – अ) औरंगपुरा – 384
10. सरस्वती भुवन, कला व वाणिज्य महाविद्यालय, (पार्ट – ब) औरंगपुरा – 384
11. मिलिंद विज्ञान महाविद्यालय, नागसेन वन परिसर, छावणी परिसर – 288
12. डॉ. सौ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महविद्यालय, समर्थ नगर – 288
13. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा – 277
14. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा – 195.