नवी दिल्ली : आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी RBI ने महत्त्वाची माहिती दिली आहे. रविवारी 18 एप्रिल रोजी रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा कमीत कमी 14 तास चालणार नाही. तांत्रिक सुधारणा आणि आरटीजीएसच्या चांगल्या व्यवहारासाठी यंत्रणा अद्ययावत केली जात आहे. त्यासाठी ही सेवा 14 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी त्यांचे महत्त्वाचे काम अगोदरच करून घेणे आवश्यक आहे.
आपत्कालीन काळात RTGS सिस्टमचा रिकव्हरी स्पीड वाढवण्यासाठी 18 एप्रिलला RTGS चं टेक्निकल अपग्रेडेशन केलं जाईल. त्यामुळे 18 एप्रिल रविवारी आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी रविवारी ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना आपल्या पेमेंट ऑपरेशन्सचं प्लॅनिंग त्यानुसार करावं असं, आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1381658101804228611?s=19
रविवारी RTGS मनी ट्रान्सफर सर्विस बंद असली, तरी NEFT द्वारे ग्राहक ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतात. RTGS च्या तांत्रिक सुधारणांसाठी आणि चांगल्या ट्रान्झेक्शनसाठी हे पाउल उचललं जात आहे. आरबीआयकडून याबाबत लेखी सूचना जारी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात RBI ने देशात NBFCs, फिनटेक स्टार्टअप्स (Fintech Startups) आणि पेमेंट बँकेला RTGS आणि NEFT द्वारे फंड्स ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता बँकांशिवाय इतर वित्तीय संस्थांनाही आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे व्यवहार करण्याची सुविधा मिळेल.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1381622256632098818?s=19
मागील वर्षी डिसेंबरमध्ये RBI ने RTGS सेवा 24 तास आणि सातही दिवस उपलब्ध केली. याआधी ही सुविधा केवळ बँक वेळेत मिळत होती. आरटीजीएससाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2019 पासून RTGS आणि NEFT द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर चार्ज आकारणं बंद केलं.
https://twitter.com/Trendypedia2/status/1381756235981197318?s=19
* RTGS म्हणजे काय?
– RTGS ही पैसे पाठवण्याची प्रक्रिया आहे, ज्यात व्यवहार वेगाने होतात. त्याचे पूर्ण नाव रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे.
– या प्रणालीद्वारे आपण एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेत सहजपणे पैसे हस्तांतरित करू शकता.
– RTGS मध्ये पैसे त्वरित हस्तांतरित केले जातात. त्यास पैसे पाठविण्याची मर्यादा आहे.