Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’- अमेरिका परराष्ट्र मंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’- अमेरिका परराष्ट्र मंत्री

admin
Last updated: 2025/05/07 at 4:13 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन , 7 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्याच्या बदला घेत भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला आहे.या एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.या कारवाईनंतर आता पाकिस्तानला अमेरिकेकडून भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत दाखवू नये, असा इशारा मिळाला आहे.

अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना पाकिस्तानला समज दिली आहे. व्हाइट हाऊसमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ‘भारताने स्ट्राइक केलाय. पाकिस्तानने आता त्याला उत्तर देण्याचा विचारही करु नये. भारताबरोबर युद्ध करण्याची हिम्मत पाकिस्तानने दाखवू नये’ असं अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

भारताबद्दल रुबियो असही म्हणाले की, ‘भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार होता. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कुठलाही हल्ल्याचा प्लान बनवू नये’

अमेरिकेने पाकिस्तानला समज दिली असली, तरी पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची भाषा केली जात आहे. मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी NSA शी चर्चा करुन शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या स्ट्राइकला उत्तर देण्याचा पाकिस्तानने विचारही करु नये, असं अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

मार्को रुबियो यांनी या हल्ल्यानंतर सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करुन म्हटलय की, ‘मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती लवकर निवळेल. शांततामय तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही नेतृत्व मिळून काम करतील’

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एअर स्ट्राइकनंतर लगेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. त्यांना ऑपरेशन दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ टिप्पणी करत वेगाने तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘भारत आणि पाकिस्तानात दीर्घकाळापासून लढाई सुरु आहे. हे लवकर संपेल एवढीच मला अपेक्षा आहे’ असं ट्रम्प म्हणाले.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानात 9 ठिकाणी ‘एअर स्ट्राईक’
Next Article पुण्याच्या एअरबेसवरूनही लढाऊ विमानांच्या आकाशात घिरट्या

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?