Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टमधून हेमांगी कवीने मांडलं वास्तव…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टमधून हेमांगी कवीने मांडलं वास्तव…

Surajya Digital
Last updated: 2021/07/13 at 11:16 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

मुंबई : अनेक मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटतं, मात्र लोक काय म्हणतील या भीतीने त्या घट्ट ब्रा वापरुन स्वतःवर अन्याय करतात, असे अभिनेत्री हेमांगी कवीने म्हटले आहे. ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टमधून तिने वास्तव सागितलं आहे. ब्रा घालावी की नाही, हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो, मग ती घरी असो किंवा कुठेही, असे हेमांगीने म्हटले आहे. मुलींना स्वतंत्रपणे जगू द्या, असे आवाहन तिने केले आहे.

ताई मी सहमत आहे तुमच्या मताशी.“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.” #HemangiKavi

— Ranjitsinh Kadam (@RanjitsinhKada1) July 13, 2021

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंतीला उतरली आहे. हेमांगी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. समाजिक मुद्दे मांडणं असो किंवा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देणं यात ती कधीही मागे हटत नाही. नुकतच हेमांगीला एका व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत हेमांगीने या नेटकऱ्यांची बोलतीच बंद केली होती.

“बाई, बुब्स आणि ब्रा” या शिर्षकाखाली तिने ही पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”

स्त्रींयांना त्यांच्या कपड्यांवरून तसचं अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलचं सुनावलं होतं. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवरदेखील एक पोस्ट शेअर करत समाजात स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संगीतकार लकी अलीने घेतली ठाकरेंची भेट, केले कौतुक https://t.co/MkJaa4RlMh

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021

स्त्रीयांना त्यांच्याच शारिरीक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने तिचं बेधडक मत मांडलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.

पुढे हेमांगीने समाजात वावरताना मुलींना किंवा स्त्रीयांना त्यांच्या अंर्तवस्त्रामुळे येणाऱ्या बंधनावर तिचं मत पाडंलं आहे. हेमांगीच्या या बेधडक पोस्टवर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तिचं कौतुक केलंय. ते म्हणाले, “विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..खन म्हणुन वरचा दर्जा .साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी.”असं म्हणत प्रविण तरडेंनी त्यांच्या हटके स्टाइलने हेमांगीला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील हेमांगीचं कौतुक केलंय.”लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद आहे.” असं रसिका म्हणाली.

तर हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री वीणा जामकरनेदेखील हेमांगीला पाठिंबा दिलाय. “क्या बात हेमांगी..सॉलिड , लय भारी . वाचून सुद्धा हायसं वाटलं गं .” असं वीणा म्हणालीय.

कलाकारांसोबतच अनेक नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी हेमांगीचं कौतुक करत तिने मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या आधीदेखील हेमांगीने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. नुकतच हेमांगीने ‘सारेगम लिट्ल चॅम्पस्’ या कार्यक्रमातील पंचरत्नांवर होणाऱ्या टीकेवर परखड मत मांडलं होतं.

* हेमांगीने केलेली पोस्ट आहे तशी

बाई, बुब्स आणि ब्रा

बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!
मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!
हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!
पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…
ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!
आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!
Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!
ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?
किती तरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात… 2 2 ब्रा घालतात, nipple area ला tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात… बाप रे!…कशासाठी एवढं आणि का?
किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही ‘लोग क्या कहेंगे’ या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!
स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी ‘काढण्याची मुभा’ दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार!
बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो prob त्या पुरुषांचा आहे!
आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं ‘त्यांच्या’ डोक्यात पक्कं आहे!
आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही!
बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!
याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही!
अरे किती ती बंधनं? किती ते ‘लोक काय म्हणतील’ चं ओझं व्हायचं?
अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या!
खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छे ने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #kavihunmain #hemangikavi

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #post #Women #Boobs #Bra #Hemangikavi, #बाई #बुब्स #ब्रा #पोस्टमधून #हेमांगीकवीने #मांडलं #वास्तव #पाठिंबा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता इथे राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल त्यादिवशी बघू – पंकजा मुंडे
Next Article मैत्री आणि लोककार्याचा झरा : राजेशअण्णा कोठे जयंतीविशेष… (ब्लॉग)

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?