सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
आर्थिक फायद्यासाठी परजिल्ह्यातील महिलांना कलाकेंद्रात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परिते (ता.माढा) येथील साई कलाकेंद्रावर धाड टाकून पाच पुरुष आणि चार महिला अशा नऊ जणांना अटक केली आहे. आरोपी कलाकेंद्रात १३ महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चार महिलांना न्यायालयीन कोठडी पाच पुरुषांना पोलिस कोठडी दिली आहे.
याप्रकरणी राजकुमार प्रभाकर पवार (रा. परिते ता. माढा), धीरज बाजीराव चौंधे (रा. टेंभुर्णी), दादाराव चव्हाण (रा.परिते), रोहन श्रीकृष्ण चव्हाण, सचिन नवनाथ सावंत (रा.परितेवाडी) कविता लाला पवार (रा.टेंभुर्णी), रमा मधुकर शिंदे (रा.नागझरी, जि.बीड), शारदा भिवा चंदनकर (रा.मोडनिंब) रिजवान दिलावर शेख (रा.खंडाळी जि. लातूर) यांना अटक केली आहे. पंढरपूरच्या परिविक्षाधीन आयपीएस अंजनाकृष्णा व्ही. एस. व टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने कारवाई केली.