Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळमध्ये येऊन मुख्यमंत्री सावंतांची राजन पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

मोहोळमध्ये येऊन मुख्यमंत्री सावंतांची राजन पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर

Surajya Digital
Last updated: 2023/02/22 at 10:28 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिलंय. राष्ट्रवादी ऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या, अशी साद घातलीय. Come to Mohol, Chief Minister Pramod Sawant’s offer to Rajan Patal to join BJP, visit Pandharpur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● पुन्हा एकदा मोदींचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

 

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ.प्रमोद सावंत यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना एक प्रश्न आवर्जून विचारला की हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, आपण भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री आहात. मग आपण यांच्या निवासस्थानी आपुलकीने आवर्जून भेटीला येण्याचं कारण काय ? यावेळी अत्यंत नम्रपणे, शांतपणे एकच उत्तर त्यांनी दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे ” हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी युवा नेते बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेल्याचे उपस्थित नेत्याने सांगितल्याची माहिती आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या असे भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे माजी आ राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण  सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आसलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ.प्रमोद सावंत यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या निवासस्थानी आज भेट दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक दिवसापासून चर्चिला जाणार प्रश्न विचारलाच. राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, आपण भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री आहात. मग आपण यांच्या निवासस्थानी आपुलकीने आवर्जून भेटीला येण्याचं कारण काय ? यावेळी अत्यंत नम्रपणे, शांतपणे एकच उत्तर त्यांनी दिले की “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे ” हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

यावेळी पुत्र बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेले. यानंतर राजन पाटील प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की मतदार संघातील सर्व कार्यकर्ते व मतदारांना विश्वासात घेऊनच पक्ष प्रवेशा बाबत निर्णय घेतला जाईल, यावेळी राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

● पुन्हा एकदा मोदींचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

 

 

पंढरपूर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आज पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळेस 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले.

महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्या कोणाला घ्या यासाठी मी कुणाला बोललो नाही, किंवा त्यासाठी आलोही नाही, परंतु माझ्या इथे येणे जर भाजपला फायदा होणार असेल तर मला ते आवडेल. गोव्यामधील भाविक ही पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आम्हाला पंढरपूर मध्ये जागा उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी गोवा भवन उभारण्याचा प्रयत्न करतो.

 

 

 

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #Come #Mohol #ChieMinister #PramodSawant's #offer #RajanPatil #join #BJP #visit #Pandharpur, #मोहोळ #मुख्यमंत्री #प्रमोदसावंत #राजनपाटील #भाजप #ऑफर #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा आंदोलन : दिलीप माने
Next Article पैशाच्या कारणावरून बहिणीचा खून; सख्खी बहीण आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?