Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन

Surajya Digital
Last updated: 2021/05/22 at 9:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई / नागपूर : सुपरहिट ‘मैने प्यार किया’चे संगीतकार ‘राम-लक्ष्मण’ यांचं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते दीर्घ आजारानं त्रस्त होते. २१ मे ला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. राम-लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील होतं. ‘पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमांना संगीत दिलं. ‘मैने प्यार किया’ सिनेमा साठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट  संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.

मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना तातडीचा आदेश अशा प्रकारचा उल्लेख तात्काळ हटवा #surajyadigital #Modi #Sarkar #मोदी #socalmedia #socal #media #सोशलमीडिया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0qwyXWzEvQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021

आज शनिवारी दुरापी १२ वाजता त्यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते. राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.

Mujhe abhi pata chala ki bahut guni aur lokpriya sangeetkar Ram Laxman ji (Vijay Patil) ji ka swargwas hua. Ye sunke mujhe bahut dukh hua. Wo bahut acche insaan the.Maine unke kai gaane gaaye jo bahut lokpriya hue. Main unko vinamra shraddhanjali arpan karti hun. pic.twitter.com/CAqcVTZ8jT

— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 22, 2021

* या सिनेमांना दिलं संगीत

पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

Good night friends with paying tribute to music director with one of my favourite compositions by #RamLaxman https://t.co/3aGKODooPX

— Shankar Jaikishan : The Maestro of the Millennium (@SJFansAssnCal) May 22, 2021

* राम-लक्ष्मण नावामागची गोष्ट

जेव्हा विजय पाटील मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.

R.I.P. #RamLaxman…
Favorite song:https://t.co/Qjq2qcaYUO@narendramodi @RahulGandhi @priyankagandhi @salkhanacademy @bhagyashree123 @rajshri #bollywoodsongs #India #1 🇮🇳😭😢

(courtesy of) @MadhuriDixit https://t.co/SAgD0Udh5p pic.twitter.com/ZLVUIpui9v

— Shyamal Chandra 🇺🇸 (@shyamal_chandra) May 22, 2021

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Seniormusician #VijayPatil #alias #Ramlaxman #dies #Nagpur, #ज्येष्ठसंगीतकार #विजयपाटील #उर्फ #रामलक्ष्मण #नागपूरमध्ये #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार प्रणिती शिंदेंच्या आरोपावर पालकमंत्री पत्रकार परिषदेमधून गेले उठून
Next Article बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार मागितले

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?