Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वीस वर्षानंतर येतोय गाजलेल्या ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

वीस वर्षानंतर येतोय गाजलेल्या ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल

Surajya Digital
Last updated: 2022/04/26 at 5:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

# वर्षाच्या अखेरीस होणार रिलीज

मुंबई : ‘गदर 2’ सिनेमाचे दुसऱ्या टप्प्यातील शूटिंग पूर्ण झाले आहे. जवळपास या चित्रपटाचे शूटिंग सध्या पूर्ण होत आले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट यावर्षीच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येऊ शकतो. हीट सिनेमा गदरचा हा दुसरा भाग आहे.

‘गदर’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली आहेत. या चित्रपटात ‘सकिना’ ही भूमिका अमिषा पटेलने, तर ‘तारा सिंह’ ही भूमिका सनी देओलने साकारली होती. कोणीही विसरू शकणार नाही असा हा चित्रपट होता. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावले. दिग्दर्शक – निर्माता अनिल शर्मा दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित, या चित्रपटात पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना अर्थात सुपरस्टार सनी देओल, अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल अभिनित ‘गदर’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे हे चित्रीकरण ‘लखनऊ’मध्ये सुरु होते. या चित्रपटात देखील सनी आणि अमिषाची जोडी झळकणार आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या आयकॉनिक चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आयकॉनिक पीरियड ड्रामा चित्रपट ‘गदर 2’ ची शूटिंग लखनऊमध्ये पूर्ण झाली आहे.

Sunny Deol, the sequel to the hit film ‘Ghadar’ is coming after 20 years

https://twitter.com/taran_adarsh/status/1518546277549559808?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518546277549559808%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

‘गदर 2’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या पूर्ण होत आले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या उर्वरित शूटिंगचे पुढील शेड्यूल या वर्षी जूनमध्ये सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची काही सीन्स बाराबंकी शहरातील जिल्हा कारागृहात झाले आहे. या सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगसाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सरकारकडून परवानगी घेतली होती.

अमिषा पटेल आणि सनी देओल यांचा ‘गदर’ हा चित्रपट 2001मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती. चित्रपटातील जबरदस्त सीन्स, संवाद आणि गाणी यांनी धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी देखील चाहते तितकेच उत्सुक आहेत.

या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. गदर 2 चित्रपटाच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या भाग 2 चे जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. यासोबतच चित्रपटाच्या शूटिंगचे पुढील शेड्यूल या वर्षीच्या जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे.

 

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #SunnyDeol #sequel #hitfilm #Ghadar #coming #20years, #वीस #वर्ष #गाजलेल्या #गदर #चित्रपट #सिक्वेल #सन्नीदेओल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवनीत राणांचा थेट पुराव्यासह व्हिडिओ पोलिसांनी केला व्हायरल, पहा व्हिडिओ
Next Article बार्शीत गुंडगिरी करणार्‍या 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?