Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवजयंती । छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लीम समाज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsब्लॉग

शिवजयंती । छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लीम समाज

Surajya Digital
Last updated: 2023/02/19 at 10:00 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

छत्रपती  शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात मोठ्या अभिमानाने आणि आदराने घेतले जाते. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती राज्यभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनही साजरा केला जातो. Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj and Muslim Society Blog

 

Contents
छत्रपती  शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात मोठ्या अभिमानाने आणि आदराने घेतले जाते. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती राज्यभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनही साजरा केला जातो. Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj and Muslim Society Blogस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ मुख्तार खानजनवादी लेखक संघ, मुंबई

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक विधी पूर्ण केला होता. इतिहासात अनेक राजे, सम्राट होऊन गेले, ज्यांनी जनकल्याणाची कामे केली, ते लोक आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा असेच महान राज्यांपैकी सर्वोच्च फळीतील महान शासक होते, ज्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोणताही भेदभाव न करता लोककल्याणाची कामे केली. त्यामुळे इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही लोक त्यांची आठवण ठेवतात.

शिवाजी महाराज फक्त
हिंदूंचेच राजे होते का?

शिवाजी महाराजांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू शासक म्हणून चित्रित केले जात आहे. शिवाजी महाराजांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला केवळ हिंदू धर्माच्या चौकटीतून पाहणे योग्य ठरेल का? शिवाजी महाराजांचे विशाल व्यक्तिमत्त्व केवळ धर्माचे रक्षक म्हणून मांडणे म्हणजे आपल्याच महापुरुषांचा मान कमी करण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचे जीवन सांगते की- त्यांनी आपल्या कारकिर्दीत उच्च आदर्श मांडला.

संत, पीर औलिया तसेच सर्व धर्मांचा त्यांनी खऱ्या मनाने आदर केला. त्यामुळेच त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तेव्हा स्थानिक मराठ्यांसह महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने मुस्लिमांनीही त्यांना साथ दिली. त्या काळात शिवाजी महाराजांच्या सैन्यात राहिलेल्या मराठ्यांना शिवाजीचे मावळे म्हणतात. या मावळ्यांमध्ये हजारों मुस्लिमांचाही सहभाग होता. त्यामुळे आजही कोल्हापूर, साताऱ्यातील मुस्लीम बांधव शिवाजी जयंतीच्या मिरवणुकीत मोठ्या थाटामाटात सहभागी होतात.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

शिवाजी महाराजांचे घराणे सुफी संतांचा खूप आदर करायचे. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या दोन मुलांची नावे शाहजी आणि शरीफजी मुस्लीम पीर बाबा शाह शरीफ यांच्या नावावर ठेवली होती. खुद्द शिवाजी महाराजांना सुफी संत बाबा याकूत यांच्याबद्दल नितांत आदर असायचा. त्यांच्या काळात त्यांनी अनेक खानकांसाठी दिव्याची व्यवस्थाही केली होती. शिवरायांच्या काळात स्त्रियांना विशेष मान दिला जात असे. युध्दाच्या काळातही महिलांच्या स्वाभिमानाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात असे.

 

शिवाजी महाराजांचा आपल्या मुस्लीम सैनिकांवर अतूट विश्वास होता. शिवाजी महाराजांच्या प्रचंड सैन्यात ६० हजारांहून अधिक मुस्लीम सैनिक होते. त्यांनी एक मजबूत नौदलही स्थापन केले होते, या नौदलाची संपूर्ण कमान मुस्लीम सैनिकांच्या हाती होती. सागरी किल्ल्यांचे व्यवस्थापन बाग दोर दर्या सारंग, दौलत खान, इब्राहिम खान सिद्दी मिस्त्री यांसारख्या अनुभवी मुस्लीम गव्हर्नरांकडे सोपवण्यात आले होते. शिवाजी महाराजांचे औदार्य आणि कार्यशैली पाहून रुस्तमोजमान, हुसेन खान, कासम खान असे अनेक मुस्लीम सरदार विजापूर संस्थान सोडून सातशे पठाणांसह शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. सिद्दी हिलाल हे शिवाजी महाराजांच्या जवळच्या सरदारांपैकी एक होते. सिद्दी हिलालने शिवाजीसोबत अनेक आघाड्यांवर आपले शौर्य दाखवले.

 

शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुतेक तोफखाना मुस्लीम सैनिकांचा असायचा. या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता. तर शमाखान, इब्राहिमखान हे घोडदळाच्या तुकडीचे प्रमुख होते. सिद्दी इब्राहिम हा शिवरायांच्या खास अंगरक्षकांपैकी एक होता. अफझलखानाशी झालेल्या चकमकीत सिद्दी इब्राहिमने आपला जीव धोक्यात घालून शिवाजी महाराजांना वाचवले. पुढे शिवाजी महाराजांनी त्यांची फोंडा किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. महाराज आणि त्यांचे मुस्लीम सहकारी यांचे एकमेकांशी घट्ट नाते असावे याची साक्ष सर्व तथ्ये देतात.

 

शिवाजी महाराज जेव्हा आग्रा
किल्ल्यात नजरकैदेत होते, तेव्हा मदारी मेहतर नावाच्या मुस्लीम व्यक्तीने त्यांच्या तुरुंगातून पळून जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जिवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांचे रूप धारण करून ते निर्भयपणे शत्रूंच्या मध्ये जाऊन बसले. शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मनिरपेक्ष भूमिकेने सर्वधर्मीय सहकाऱ्यांची मने जिंकली होती, म्हणूनच ते आपल्या राजासाठी प्राण द्यायला तयार झाले.

काझी हैदर हे पर्शियन भाषेचे अभ्यासक होते. शिवाजी महाराजांनी त्यांची वकील म्हणून नियुक्ती केली होती. प्रशासनातील पत्रव्यवहार आणि करार आणि गुप्त योजना यामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा. एकदा एका हिंदू सरदाराने काझी हैदरबद्दल शंका व्यक्त करून महाराजांना सावध राहण्याचा सल्ला दिला. त्यावर शिवाजी महाराज त्यांना लगेच म्हणाले, ‘प्रामाणिकपणा कुणाची जात पाहून होत नाही, तो त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. ‘

✍️ ✍️ ✍️

○ मुख्तार खान

जनवादी लेखक संघ, मुंबई

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #MuslimSociety #Blog, #शिवजयंती #छत्रपती #शिवाजीमहाराज #मुस्लीम #समाज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फक्त 18 लोकांच्या उपस्थितीत नारळ फोडून स्थापन झालेली शिवसेना … काल… आज…उद्या
Next Article सोलापूरचे पॉलिटिक्स ‘टर्निंग पाईंट’ वर, राजकीय समीकरणे पार बदलणार

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?