मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी संकटात सापडली आहे. तिने २९ लाख रूपये घेतले. पण कार्यक्रमाला आली नाही, अशी फसवणुकीची तक्रार आर श्रेयसने पोलिसात दिली आहे. सध्या सनी केरळमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. दरम्यान, याप्रकरणी केरळ क्राईम ब्ँचने सनीची चौकशी केली. यावेळी सनीने आपली बाजू मांडताना म्हटले, की ‘कोरोनामुळे कार्यक्रमाला जाऊ शकली नाही. शिवाय, ५ वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलली. त्यामुळे आयोजक याला जबाबदार आहेत’.
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केरळमध्ये गेलेल्या अभिनेत्री सनी लिओनीची केरळ क्राइम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली. सनीविरोधात २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यक्तीने दाखल केली होती. त्याचप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. २०१९ मध्ये व्हॅलेंटाइन डेला सनी एका कार्यक्रमात हजेरी लावणार होती. यासाठी तिला पैसेही देण्यात आले होते. पण ऐनवेळी ती गैरहजर राहिल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने केली.
‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, पेरुंबवुर या ठिकाणचे रहिवासी शियास यांनी ही तक्रार दाखल केली होती. ही तक्रार क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर क्राइम ब्रांचने तिरुवअनंतपुरममधील पूवर याठिकाणी सनीचा जबाब नोंदवून घेतला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सनीला कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी २९ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र ती ऐनवेळी हजर राहिलीच नाही, असा आरोप शियास यांनी केला.
“नियोजित कार्यक्रमाची तारीख बऱ्याच वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे इतर कार्यक्रमांच्या तारखांमध्ये अडचण झाली होती. करारानुसार मला माझी पूर्ण रक्कम देण्यात आली नव्हती. साडेबारा लाख रुपये त्यांनी थकवले आहेत”, अशी माहिती सनीने क्राइम ब्रांचला दिली. क्राइम ब्रांचने दोन पक्षांचे व्हॉट्स अॅप चॅट्ससुद्धा तपासून पाहिले. याप्रकरणी क्राइम ब्रांच सध्या कार्यक्रमाला हजर लावणाऱ्या इतर सेलिब्रिटींचा शोध घेत आहे.