नाशिक, 14 मे (हिं.स.)।
: गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्यासाठी प्रती रेशनकार्ड 500 रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये लाचेची मागणी करत त्याबदल्यात चार हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी इगतपुरी येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी व खासगी एजंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. इगतपुरी तालुक्यातील पुरवठा निरीक्षक ललित सुभाष पाटील आणि सोमनाथ टोचे रा. भरवीर, ता. इगतपुरी असे या लाचखोरांचं नावे आहेत.
तक्रारदार हे त्यांच्या गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्यासंदर्भात पुरवठा विभागातील अधिकारी ललित पाटील व गोसावी यांना भेटले होते. त्यांनी खासगी इसम सोमनाथ टोचे यांच्या समक्ष प्रत्येक रेशनकार्ड ला 500 रुपये याप्रमाणे दर ठरवून 4 हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित 26 हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पथकाने ही कारवाई केली. लाचेच्या रकमेपैकी चार हजार ललित पाटील यांना यापूर्वीच पोच झाले असून, 10 हजार खासगी इसम टोचे याने स्वीकारल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.