मुंबई : ‘महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन 2020’ ची यादी नुकतीच जाहीर झालीय. यात अभिनेत्री तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरलीय. तसेच, शेंटीमेंटल, बॉईज2 मधील पल्लवी पाटील दुसऱ्या स्थानी आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1398846081706848262?s=19
मराठीतील ‘शिकारी’, झी 5 वरील ‘काळे धंदे’ या सिनेमांमुळे चर्चेत आलेली नेहा खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1398814138604814338?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’चा किताब जिंकला आहे. ‘क्लासमेट्स’, ‘बॉईज २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री पल्लवी पाटीलने दुसरं स्थान पटकावलंय. पल्लवी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ‘शिकारी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खान तिसऱ्या स्थानावर आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1398637670587371522?s=19
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत भूमिका साकारणारी मीरा जगन्नाथ चौथ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री नयना मुकेनं पाचवं स्थान पटकावलंय. छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील या यादीत सहाव्या स्थानावर आहे. पाहिले न मी तुला या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी मुंडले सातव्या स्थानी आहे.
१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार https://t.co/oIjtMxKZ5i
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
अभिनेत्री पूजा बिरारी आठव्या क्रमांकावर आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे नवव्या स्थानी आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले दहाव्या क्रमांकावर आहे.
फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021