Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योजनांचा लाभ द्यावा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योजनांचा लाभ द्यावा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

admin
Last updated: 2025/04/08 at 1:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 8 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

ॲड. हेलोंड म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना आहेत. शेतीमधील उत्पादन वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रेरणा प्रकल्प कार्यरत आहे. यातून शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील. जिल्ह्यात केवळ 232 शेतकरी आत्महत्या केलेले कुटुंब आहे. त्यामुळे या प्रत्येक घरी अधिकारी पाहोचून त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवक प्राधान्य मानून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

कौशल्य विकास तसेच आरसेटीच्या माध्यमातून कमी कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा उपयोग होऊन तातडीने उत्पन्नाचे साधन त्यांना मिळू शकेल. या योजना माहिती होण्यासाठी ग्रामपातळीवर प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच शेतकऱ्यांना रेशनचे धान्य मिळावे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, कर्ज सुविधा मिळावी, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा, तसेच सर्व बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे सक्तीचे केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच अवैध सावकारांवर कारवाई करून जमीन मूळ मालकास परत करावी. यात आतापर्यंत 18 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे, ही स्वागतार्ह बाब असून येत्या काळात कार्यवाहीचा वेग वाढविण्यात यावा, अशा सचूनाही ॲड. हेलोंडे यांनी दिल्या.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘आंबट शौकीन’ येत आहेत १३ जूनला
Next Article Selection list of scholarship eligible students from National Economically Weaker Sections is available on the website. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी संकेतस्थळावर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?