Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल वीस वर्षानंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल येणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

तब्बल वीस वर्षानंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल येणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/17 at 4:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : सनी देओल, अमीषा पटेल यांचा ‘गदर- एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. यात सनी देओल आणि अमिषा पटेल पुन्हा एकदा दिसणार आहेत. तर चित्रपटातील लहान मुलगा उत्कर्ष सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत असेल. उत्कर्ष सिने दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. दरम्यान, अनिल शर्मा यांनी सिक्वलवर विचार सुरु असून वेळ आल्यावर चित्रपटाची घोषणा करू, असं सांगितले आहे.

२००१ मध्ये आलेल्या सनी देओल आणि अमिषा पटेलच्या ‘गदर-एक प्रेमकथा’ने वारेमाप प्रसिद्धी मिळवली होती. ज्या वर्षात हा सिनेमा रिलीज झाला होता, त्या वर्षात ‘गदर’ने उत्पन्नाचे विक्रम मोडले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘गदर’च्या सिक्‍वेलची चर्चा सुरू होती. आता डायरेक्‍टर अनिल शर्मा यांनी या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे.

सनी देओल, अमीषा पटेल यांची ‘गदर- एक प्रेमकथा’ तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्शभूमीवर सुरु झालेली ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनावर चांगलीत कोरली गेली होती. अमरीश पुरी यांच रौद्ररुप, सनी देओलची दमदार अॅक्शन आणि अमिता पटेलचं मातृप्रेम अशा मनोरंजानाने परिपूर्ण असलेल्या गदर सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या सिनेमातील गाणीदेखील प्रचंड गाजली होती.

आता पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांनी ही प्रेमकथा अनुभवायला मिळणार आहे. 2001 सालात आलेल्या ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमाचा सिक्वल लवकरच येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिने दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाच्या सिक्वलची तयारी करत असल्य़ाचं कळतंय. या सिनेमाच्या सिक्वलसाठी प्लॉट आणि स्क्रिप्टवर कामदेखील सुरु करण्यात आल्याचं एका वृत्तात सांगण्यात आलंय.

विशेष म्हणजे सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा या सिक्वलमध्ये झळकणार आहेत. याचसोबत ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमात सनी देओल यांच्या मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष हा देखील या सिनेमात झळकणार आहे. उत्कर्ष का दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. उत्कर्ष ‘गदर’च्या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 2018 सालात आलेल्या ‘जीनियस’ या सिनेमातून उत्कर्षने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली.

मिड डे च्या वत्तानुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सिनेमाच्या सिक्वलबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी “सिक्वलवर चर्चा सुरु आहे. अद्याप काही सांगू शकत नाही ,योग्य वेळ आल्यावर अधिकृत घोषणा केली जाईल.” असं म्हंटलं आहे.


* मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

* उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Thesequel #Ghadar #movie #willcomeafter #twentyyears, #तब्बलवीस #वर्षानंतर #गदर #सिनेमाचा #सिक्वल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सचिन वाझेंच्या मर्सिडीजमध्ये आढळले पैसे मोजण्याचे मशीन आणि भाजप नेत्याचे फोटो
Next Article मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी या जोडीला झाली कोरोनाची लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?