कीव /नवी दिल्ली : युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले असल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. यानंतर रशियाकडून युक्रेनमधील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.
बॉम्बहल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मारियुपोल येथे रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्यावर आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत. मात्र, हा गोळीबारामुळे झाला आहे की स्फोट झाल्याने झाला आहे हे अद्याप स्पष्ट नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती या संकटाला उत्तर देताना म्हणाले की, खेदाने आम्हाला म्हणावे लागेल की, हा तणाव कमी करण्यासाठी सर्व संबंधित आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वेळीच योग्य पावले उचलली गेली नाहीत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. तसेच पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क शहरात आज पहाटे किमान पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
युक्रेन स्वत:ला सुरक्षित ठेवेल आणि जिंकेलसुद्धा असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे. पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. युक्रेनमधील शांत शहर आता युद्धाच्या सावटाखाली आहे. हे खूपच आक्रमक असं युद्ध आहे. पुतीन यांना थांबवणं जगाला शक्य आहे आणि थांबवायलाच हवं. आता कृती करण्याची वेळ आली असल्याचंही ते म्हणाले.
जगाने आता तातडीने पावलं उचलायला हवी. रशियावर लवकरात लवकर निर्बंध लादायला हवेत. तसंच रशियाला सर्व बाजूनी घेरायला हवं, त्यांची नाकाबंदी करून एकटं पाडायला हवं. शस्त्रे इतर आवश्यक साधनांची युक्रेनला मदतीची गरज आहे. तसंच आर्थिक आणि मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीचा हात हवा आहे. युरोपसह जगाचं भविष्य यामुळे धोक्यात आल्याचंही दिमित्रो कुलेबा यांनी सांगितलं.
Russia declares war on Ukraine; 30,000 women take up arms in Ukraine
https://twitter.com/ANI/status/1496697184527523854?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1496697184527523854%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याचबरोबर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता रशियानं यूक्रेनवर मिसाइल हल्ले सुरु केलेत. या दोन्ही देशांमधील तणावाचा जगावर परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात सुरुवात केली आहे. तर आणखी निर्बंध लावू असा इशाराही दिला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारत-रशिया यांच्यात झालेल्या सुरक्षा करारावरही होण्याची शक्यता आहे. परंतु भारत – रशिया (India-Russia Relations) संबंधांवर याचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास रशियानं व्यक्त केला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यानेही लढाईची तयारी सुरु केली आहे. युक्रेनने आपल्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महिलांची भरती केली आहे. युक्रेन या महिलांना मूलभूत लढाऊ प्रशिक्षण देऊन युद्धभूमीवर उतरवणार आहे. दरम्यान, 30 हजारांहून अधिक महिला लष्करात दाखल झाल्या असल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे. याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मार्केट उघडताच सेन्सेक्स 2000 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल 580 अंकांनी कोसळला आहे. बँका, ऑटो, पीएसयू यामध्ये प्रचंड विक्री झाली आहे. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.