Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वळसंगकर आत्महत्या प्रकरण : सून आणि तिचे वडील बेपत्ता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

वळसंगकर आत्महत्या प्रकरण : सून आणि तिचे वडील बेपत्ता

admin
Last updated: 2025/05/05 at 5:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 5 मे (हिं.स.) : न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसांनंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे. ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नाही.तशातच डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्या हॉस्पिटलच्या घरी राहायला देखील आल्याचे विश्वसनीय सूूत्रांनी सांगितले.

डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. डॉ. आश्विन यांचे हॉस्पिटलचे घर सोडून मोदी येथील घरात स्थलांतर करणे यासह वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलहाचीही चर्चा रंगली आहे. तशातच आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे.

दोघे भारत सोडून गेल्याचीही कुजबुज कर्मचार्‍यांमध्ये सुरू आहे.डॉ. दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचेही काहीजण सांगत आहेत. डॉ. शोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार आहेत. त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. शोनाली या 30 मे नंतर ओपीडी पहाणार आहेत असेही काही कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चा असल्यातही ते दोघे नेमके गेले कुठे याची कोणालाच कल्पना नाही.————–

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Next Article खलिस्तानी दहशतवाद्यांची हिंदू समुदायाला कॅनडा सोडण्यासाठी धमकी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?