Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘वाऱ्याची झुळूक आली अन् मी प्रेग्नंट राहिले’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

‘वाऱ्याची झुळूक आली अन् मी प्रेग्नंट राहिले’

Surajya Digital
Last updated: 2021/02/17 at 9:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जकार्ता : इंडोनेशियातल्या पश्चिम जावा प्रांतातल्या सिआनजुरमध्ये विचित्र प्रकार समोर आला. ‘वाऱ्याची झुळूक आली अन् मी गरोदर राहिले. तासानंतर मी बाळाला जन्म दिला’, असा अजब दावा सिती झैनाह या महिलेने केला आहे. सितीने एका मुलीला जन्म दिला आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावरही याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, तिची ही तक्रार ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

इंडोनेशियातील पोलीस सध्या एका विचित्र घटनेचा तपास करत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचा अजब दावा एका महिलेनं केला आहे. महिलेचा दावा ऐकून डॉक्टर चक्रावले आहेत. सिती झैनाह असं महिलेचं नाव असून ती २५ वर्षांची आहे. झैनाहची तक्रार ऐकून पोलीस बुचकळ्यात पडले आहेत.

वाऱ्याची झुळूक आली आणि त्यामुळे मी गरोदर राहिले. त्यानंतर तासाभरातच मी बाळंत झाले, असा अजब दावा सितीनं केला. सितीनं एका मुलीला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. इंडोनेशियातल्या पश्चिम जावा प्रांतातल्या सिआनजुरमध्ये ही घटना घडली. ‘घराच्या हॉलमध्ये असताना खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. त्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागलं. पोटदुखी हळूहळू वाढतच गेली,’ असं सितीनं स्थानिक माध्यमांना सांगितलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोटदुखी वाढत असल्यानं मी दवाखान्यात गेले. तिथे मी बाळंत झाले. मी एका मुलीला जन्म दिला’, असं सितीनं माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. संपूर्ण प्रकार अवघ्या काही तासांत घडल्याचा दावा सितीनं केला. ‘दुपारच्या प्रार्थनेनंतर मी बिछान्यावर झोपले होते. त्यावेळी खिडकीतून आलेली वाऱ्याची झुळूक माझ्या गुप्तांगात गेल्याचं मला जाणवलं. त्यानंतर पोटदुखी सुरू झाली,’ अशी माहिती सितीनं दिली.

* हॉस्पिटलचं काय म्हणणं ?

वाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचं आणि अवघ्या तासाभरात बाळंत झाल्याचं वृत्त काही वेळातच शहरात पसरलं. त्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. सितीनं या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर कम्युनिटी क्लिनिकचे संचालक इमॅन सुलेमान यांनी प्रकरणाची अधिक माहिती घेतली. महिलेनं मुलीला जन्म दिला असून तिचं वजन २.९ किली आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे, असं सुलेमान यांनी सांगितलं. काही वेळा महिलांना त्या गरोदर असल्याचं समजत नाही. प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, असं ते पुढे म्हणाले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #windblew #gotpregnant #Jakarta #Indonesia, #जकार्ता #इंडोनेशिया, #वाऱ्याची #झुळूकआली #प्रेग्नंटराहिले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाने चिंता वाढली, पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू
Next Article महिला न्यायाधीशास महिलेने पाठविले तब्बल दीडशे कंडोमचे पाकिटे

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?