सोलापूर : सोलापूर शहरात सोमवार राञी बारापर्यंत नव्याने 153 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये 90 पुरुष तर 63 महिला रुग्णांचा समावेश आहे. 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून 59 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. आता पर्यंत 2 हजार 191 जणांनी कोरोनावर मात केली असून आता सद्य स्थितीत एकूण रुग्णसंख्या 3 हजार 988 पर्यंत पोहचली आहे.
सोलापूर शहरातील रुग्णसंख्या आता चार हजारांजवळ पोहचली आहे. आतापर्यंत 20 हजार 283 व्यक्तींच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये तीन हजार 988 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर 329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सात, 14 आणि 24 याठिकाणी अन्य प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
* नव्याने रुग्ण आढळलेले ठिकाण
आदित्य नगर, माशाळ वस्ती, माजी सैनिक नगर, वसंतराव नाईक नगर, कमला नगर, ब्रह्मचैतन्य नगर, इंदिरा नगर, सैफूल (विजयपूर रोड), कल्याण नगर, अभिषेक नगर, वैष्णवी नगर, इंडियन मॉडेल शाळेजवळ, रुबी नगर (जुळे सोलापूर), पद्मा नगर (पाच्छा पेठ), शास्त्री नगर, राजीव नगर, मंगळवार पेठ, उत्तर कसबा, दमाणी नगर, राइजवन अर्पाटमेंट, विद्या नगर, स्वागत नगर, दक्षिण कसबा, रेल्वे लाईन, द्वारका रेसिडेन्सी (वसंत विहार), सेटलमेंट कॉलनी क्र.एक, सिध्देश्वर पेठ, मित्र नगर, भिम नगर, कामाक्षी नगर (शेळगी), कर्णिक नगर, कमलेश नगर, सिध्दार्थ नगर (उत्तर कसबा), न्यू पाच्छा पेठ, भवानी पेठ, तोडकर वस्ती, शिवाजी नगर, संतोष नगर, खडक गल्ली, साई नगर, खंडोबा मंदिराजवळ (बाळे), गांधी नगर, कुमठा नाका, कुमठे, नळ बाजार, अंबिका नगर, गीता नगर, वर्धमान नगर, हनुमान नगर, जम्मा वस्ती, करंजकर सोसायटी, बनशंकरी नगर, रेल्वे सोसायटी, गौतम नगर (विजापूर नाका), बसवेश्वर नगर, मजरेवाडी, जय जलाराम नगर, संजय नगर, जय बजरंग नगर, कुमठा तांडा, रेणसिध्देश्वर नगर, वारद फार्म, मुरारजी पेठ, मोदी खाना, यश नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), बुधवार पेठ, गणेश नगर (मडकी वस्ती), दाजी पेठ, शांती नगर, निवारा नगर (एमआयडीसी), प्रताप नगर, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, एमआयडीसी रोड, रेसिडेन्सी क्वॉर्टर, हत्तुरे वस्ती, धोत्रेकर वस्ती, राजदिप गॅस गोडाउनजवळ (रविवार पेठ), बल्लारी चाळ (देगाव रोड)