सोलापुर (प्रतिनिधी) सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या’ ही सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. मनोरंजनातून प्रबोधन करत सध्या अनेक सामाजिक व अवतीभवती घडणारे विषय मालिकांमध्ये प्रभावीपणे मांडले जाऊ लागले आहेत.असाच वेगळा विषय असलेली ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता पाहता येत आहे.श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे.शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे.’भूमिकन्या’ ही मालिका अशाच एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे.अशाच एका संघर्षमय जिद्दीची कथा आपल्यासमोर या मालिकेतून उलगडणार आहे.भूमिकन्या’ मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे,गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे.’जमीन कसून तिचा मान राखणारी…एका राजाची जशी राजकन्या,तशी माझी भूमिकन्या’! असं म्हणत,आपल्या मातीतली गोष्ट आहे.असे मालिकेतील कलाकारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.