मुंबई : मराठी अभिनेता सुयश टिळकचा अपघात झाला आहे. त्याने सोशल मीडियावर याची माहिती दिली. 28 फेब्रुवारीला सुयश कॅबने जात होता तेव्हा त्या गाडीचा मोठा अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या गाडीने कॅबला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सुयशची कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली. सुदैवाने सुयश आणि ड्रायव्हरला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा एका मोठ्या अपघातातून बचावला. सुयशच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२८ फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश एका कॅबने प्रवास करत होता. रस्त्यावर अचानक एका मालवाहतूक गाडीची सुयशच्या कॅबला जोरदार धडक लागली. ही धडक इतकी भयंकर होती की ज्या कॅबमध्ये सुयश बसला होता, ती रस्त्याच्या कडेला लोटली गेली. कॅबमध्ये ड्राइव्हर आणि सुयश हे दोघेच होते. इतका मोठा अपघात होऊनही सुयश आणि कॅब ड्रायव्हरचे नशीब बलवत्तर होते, की त्यांना कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही.मात्र या दुर्घटनेत त्या कॅबचे नुकसान झाले.
सुयशच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर सुयशने सोशल मीडियावर सुखरुप असल्याची माहिती दिली. ‘तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी सुखरुप आहे आणि मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. माणुसकी अजूनही जिवंत आहे’, अशी पोस्ट सुयशने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.