अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात आज शनिवारी एकाच दिवसात कोरोनाबधित एकूण ४९ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात रॅपिड टेस्टचे ४४ तर खासगी स्वॅब टेस्टचे ०५ असे एकूण ४९ पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या ३३७ इतकी झाली आहे. आतापर्यंत अक्कलकोट शहरात आठ व ग्रामीणमध्ये दोन असे १० मृत झाले आहेत. १३० बाधित बरे झाले असुन १९७ बाधितावर उपचार सुरू आहे. रॅपिड अँटीजन टेस्टमधून सात दिवसात एकूण १५७ रुग्ण पॉझीटिव्ह आढळले. त्यामध्ये शनिवारी ४४ रुग्ण आढळले आहेत. त्यात रँपीड अन्टीजन टेस्टमध्ये अक्कलकोट शहरातील बबरे गल्लीत एक, देशमुख गल्लीत दोन,भारत गल्लीत चार व विजयनगर एक असे आठ व ग्रामीण भागातील मैंदर्गीत १९, किणीत नऊ, पितापुर दोन, घोळसगांव एक, दत्त नगर बँगेहळ्ळी रोड पाच असे ३६ एकूण ४४ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी लँबमधील स्वँबमधून मैंदर्गी एक, किणी दोन, समतानगर एक व बोरोटी एक असे पाच बाधित आढळले. तालुक्यातील अनेक नवीन गावात कोरोनाबधित रुग्ण आढळून येत असल्याने व संख्या ३०० च्या पार गेल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
आज शनिवारी केलेल्या २५६ रॅपिड अँटीजन टेस्टमधून ४४ पॉझीटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत एकूण ८२८ रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आले आहेत. त्यामधून एकूण १५७ पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.