सोलापूर : आज सोलापूर ग्रामीण भागात तब्बल 1882 जण निगेटिव्ह तर 179 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मोहोळमध्ये आज दोन मृत्यू तर आज तब्बल 54 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शनिवारी नव्याने 179 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 37 रूग्ण मंगळवेढा तालुक्यात आढळले आहेत. त्या खालोखाल अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्यात प्रत्येकी 32 रूग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या 1563 झाली असून मृतांची संख्या 43 झाली आहे. जिल्ह्यातील 514 व्यक्ती बरे होऊन घरी परतले आहेत.
आज शनिवारी 2061 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1882 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर 179 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये 117 पुरूष आणि 62 स्त्रियांचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक 37 रुग्ण सापडले असून त्यामध्ये 28 कैद्यांचा समावेश आहे. तर मोहोळ तालुक्यातील ईचगाव आणि येवती येथील प्रत्येकी एक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.