सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महानगर विभागात कोरोना रुग्ण संख्येत आता वाढ होऊलागल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढती होती. मात्र आता शहरी विभाग आणि महापालिका विभागातही रुग्ण संख्या वाढत आहे.
महापालिका विभाग रुग्णसंख्या 292 इतकी झाली आहे. सांगलीमध्ये , कुंठेमळा 2, पाटील नगर कोल्हापूर रोड 1, यशवंत नगर 1, सावली बेघर 4, माधव नगर रोड 2, शिंदे मळा 3, खणभाग 1, दत्तनगर 1, सांगलीवाडी 1, वानलेसवाडी 1, गुजरबोळ 6, चौगुले प्लॉट 2, रमामाता नगर 1, विजय नगर 1, दत्तनगर 3 , कुपवाड 1 अशी कोरोना रुग्णसंख्या आहे.
मिरजेत अंबिकानगर 3, माजी सैनिक वसाहत 1, गणेश तलाव 1 अशी संख्या वाढत आहे. शनिवार दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 37 पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी शासन निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन केले आहे.