गांधीनगर : भाजपकडून आज दोन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा झाली आहे. गुजराज भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील खासदारही आहेत. ते नवसारी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या निवडीनंतर ट्विट करून कौतुक केले आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांना हार्दिक शुभेच्छा. मला खात्री आहे की, पक्ष आणि कार्यकर्ते तुमच्या समर्थ नेतृत्वात लोकांच्या हितासाठी पूर्ण समर्पणाने कार्य करतील. जय हिंद असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गुजरातमध्ये आठ जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भावनगर पश्चिमचे आमदार जितेंद्र सावजी वाघाणी यांच्याकडे जबाबदारी होती. चंद्रकात पाटील पीएम मोदी यांच्या जवळचे मानले जातात. वाराणसीमध्ये मोदींच्या प्रचारामध्येही त्यांची महत्त्वपूर्ण होती. पाटीदार समाजाचे ते असल्याने त्यांना जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जाते.