मुंबई : बॉलीवूडमधील करन जोहर याने एका मुलाखती दरम्यान अभिनेञी कंगणाच्या आरोपावर मौन सोडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन होत असलेल्या आरोपावरुन करण जोहर शांत होता. जर अभिनेत्री कंगणा राणावतला बॉलीवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम करावा, असे म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडविरोधात आक्रमक झालेली कंगणा सध्या सोशल मीडियात कायम चर्चेत आहे. याच दरम्यान ती वारंवार बॉलीवूडवर आगपाखड करत असते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे अनेक धक्कादायक खुलासे केले की ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तिने फक्त घराणेशाहीविरोधातच आवाज उठवला नाही तर बॉलिवूडमधील माफियांवरही निर्भिडपणे बोलली.
आदित्य चोप्रापासून करण जोहरपर्यंत कंगनाने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोठे खुलासे केले. एकीकडे अभिनेत्रीच्या प्रतिक्रियांवर बोललं जात आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर करन जोहरचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
करण या व्हिडिओमध्ये कंगनाच्या नावानेच त्याला किती त्रास होतो हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यात तो म्हणतो की, ‘कंगना प्रत्येकवेळी वुमन कार्ड आणि विक्टिम कार्ड वापरू शकत नाही. आता खूप झालं. जर तुला सिनेसृष्टीत घाबरवलं जातंय तर तू सोडून दे सिनेसृष्टी. तुला कोणीही अडवलेलं नाही.’ या मुलाखतीत तो पुढे म्हणतो की, लोकांनी कंगनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तर असेच होणार असल्याचे म्हणाला.
सध्या सोशल मीडियावर अनेक लोकांचं कंगनाला समर्थन मिळत आहे. फक्त आदित्य चोप्रा आणि करण जोहरच नाही तर कंगनाने महेश भट्टांविरुद्धही अनेक प्रश्न उपस्थित केले.
कंगनाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, करण सुशांतला एक फ्लॉप अभिनेता समजायचा. उलट सुशांतच्या ज्या सिनेमाची करणने निर्मिती केली होती तो सिनेमा एग्झिब्यूटर्सला पसंत पडला नाही. अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली. बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती.