तुळजापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापुरात येथील राजे शहाजी महाद्वारसमोर आज मंगळवारी प्रतिकात्मक स्वरुपात दूध आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी तुळजापूर शहरातून बैलगाडीवर मोर्चा काढला. तहसीलदार यांना मागण्या निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरी मिळत नसल्यामुळे शेती व्यवसायाकडे वळले आहेत. अनेक कुंटुबांचे दुग्ध व्यवसायावर घर अवलंबून आहे. गेल्या चार माहिन्यापासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने दुग्ध उत्पादक हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडा आहे. तरी या राज्य सरकार ला जाग येत नाही. त्यामुळे दुध उत्पादकाना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागले आहे.
शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी केंद्र शासनाने २३ जूनला १० हजार टन दुध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा, ३० हजार टन दुधपावाडरचा बफर स्टाँक करावे, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रुपयाने देण्यात यावे, दुध पावडर, तुप, बटर इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी रद्द करावा, पुढील तीन माहिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, दुध उत्पादकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भविष्यकाळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, राजु हाके, गुरुदास भोजने, जमदाडे आदीसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.