सोलापूर : शहरात आज शुक्रवारी आलेल्या प्रशासनाच्या अहवालात कोरोनाचे एकाच दिवशी पुन्हा तब्बल 127 रुग्ण आढळून आले. यात 75 पुरुष तर 52 महिला रुग्णांचा समावेश आहे. एका रुग्णांचा मृत्यू झाला असून 185 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4305 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2569 तर महिला 1736 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 338 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 220 तर महिला 118 रुग्णांचा समावेश आहे. आज शुक्रवारी 4 वाजेपर्यंत 1350 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1223 अहवाल निगेटिव्ह तर 127 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 23 हजार 929 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 19 हजार 288 जणाचा निगेटीव्ह अहवाल आला आहे तर 4 हजार 305 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1481 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2हजार 486 आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एनजी मिल चाळीतील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.