उत्तर सोलापूर : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आवाहनानुसार उत्तर तालुक्यातून हजारो श्रीराम भक्तांकडून ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविली आहेत.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांच्या हस्ते १००० पत्रे नान्नजमध्ये पोस्ट करण्यात आली. माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांनी नुकतेच सोलापुरात वादग्रस्त विधान केले. प्रभू श्रीरामाचे मंदीर बांधून कोरोना जाणार नाही, त्यांना प्रभू श्रीरामाच्या नावाला विसर पडला आहे. समस्त देश वासीयांचे श्रध्दास्थान असणारे प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून प्रभू श्रीरामाचे जय श्रीराम लिहिलेले १० लाख पत्रे शरद पवार यांना पाठवण्यात येणार आहेत.
यावेळी लखन गवळी, अजय विटकर, सुमित बोगे, मनोज कोळी, अंकुर चव्हाण, विजय भंडारे उपस्थित होते.