वेळापूर : कोरोनो परिस्थितीत मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी रक्तचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचे अवाहन केले होते तसेच उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबीरात 81 जणांचे रक्तदान झाले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबीरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला पंढरपूर ब्लड बँकेचे चेअरमन प्रसाद खाडीलकर, जनसंपर्क अधिकारी संतोष उपाध्ये यांनी सहकार्य केले. तोंडले ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिराचे अयोजन केले.
शिबिराला तोंडले सरपंच जयश्री मोहन नाईकनवरे, उपसरपंच हरिदास चव्हाण, संजय चव्हाण, माजी सरपंच सुर्यकांत नाईकनवरे, संतोष लोंढे, ग्रामपंचायत सदस्य, बोंडले संस्थेचे चेअरमन प्रताप चव्हाण , शहाजी चव्हाण, दशरथ मोरे, पोलिस पाटील शशिकांत पाटील, अंबादास शेंडगे, अजीत कोडग, योगिता शिवशरण पाटील, दीपक चव्हाण चेअरमन पतसंस्था, मनोज चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.