सांगली : सांगली जिल्ह्यात 99 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 1643 वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात सांगली 41, मिरज 26, ग्रामीण भाग 32, सांगली महापालिका क्षेत्र रुग्णसंख्या एकूण आज अखेर 757, जिल्ह्यात एकूण मृत्यू 51 झाली आहेत. माजी नगरसेवकासह पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आटपाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, कोरोना नियंत्रण कक्षातील 14 कर्मचारी, मिरज कोरोना रुग्णालयातील नर्स, ब्रदर, वार्ड बाय बाधित झालेले आहेत. सांगली मिरज मनपा क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. रविवारी सांगलीत नवीन 41 रुग्ण आढळून आले. यामध्ये गावभाग मॉडर्न बेकरी मागे, गणेश नगर, लांडगे गल्ली, तुळजाई नगर, सांगली वाहतूक पोलीस, सह्याद्री नगर, विश्रामबाग, समता नगर येथील आहेत.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)
कुपवाड येथील माजी नगरसेवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. मिरजेत नवीन 26 रुग्ण आढळले आहेत. तसेच अंबर हॉस्टेल, जीएमसी, गर्ल्स हॉस्टेल, गुरुवार पेठ, वडर गल्ली, येथेही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रात 68 रुग्ण झालेले आहेत.
ग्रामीण मध्ये नवीन 31 रुग्ण आढळले आहेत. कवठेमहांकाळमधील बोरगाव, विठ्ठल वाडी, शिंदेवाडी प्रत्येकी एक, मिरज तालुक्यातील डिग्रज, काकडवाडी, तुंग, समडोळी, मालगाव, सुभाष नगर येथील प्रत्येकी एक रुग्ण, तर तासगाव तालुक्यातील चिंचणी, भैरवाडी, तासगाव प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. कडेगाव तालुक्यातील बोंबलेवाडी एक रुग्ण आढळून आला. पलूस तालुक्यात कुंडल, दुधोंडी येथे रुग्ण आढळले आहेत. शिराळा तालुक्यात मंगरूळ, नाठवडे येथे प्रत्येकी एक तर गवळेवाडीत दोन रुग्ण आढळून आले. वाळवा तालुक्यात रोजा वाडी येथे एक, आणि खानापूर येथे विद्या येथे दोन, माधकमुठी येथे तीन रुग्ण आढळले.
जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह 99 रुग्ण असून, उपचार सुरू असलेले 790 रुग्ण आहेत. आज पर्यंत बरे झालेले रुग्ण 790 असून, आजपर्यंत एकूण मृत्यू 51 झालेले आहेत. आज कोरोना मुक्त 48 रुग्ण झाले आहेत. आज पर्यंत जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1643 वर पोहचली आहे.