हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रचंड दबावानंतर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस उपअधिक्षक तसंच पोलीस निरीक्षक यांना योगी सरकारने निलंबित केलं आहे. त्यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसंच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.
एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि पोलीस इन्सपेक्टर यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. अखेर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली.
हाथरसच्या घटनेनंतर संबंध भारतभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरात निषेध आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे तेथील स्थानिक प्रशासनाची मुजोरी गेल्या 4 दिवसांपासून सुरु आहे. पीडित कुटुंबाला घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. पीडित कुटंब सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. पोलिसांनी पीडितेच्या संपूर्ण घराला वेढा दिलाय. प्रसारमाध्यमांना देखील वार्तांकन करण्यास मनाई केली गेली आहे.
* मारहाण केल्याचे पीडित कुटुंबाची तक्रार
पीडित मुलीच्या भावाने आम्हा सगळ्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेऊन पोलिसांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच आमचे फोनही काढून घेतले गेले आहेत. जेणेकरून आम्ही कुणाला काही बोलू नये, कुणाला काही सांगू नये, असं पीडितेच्या भावने म्हटलंय.
गेल्या 4 दिवसांपासून हाथरसमधलं वातावरण चांगलंच गरम झालंय. पीडितेच्या कुटुंबाला कुणालाच भेटू देत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांचा कुणालाच विचारपूस करु देत नाहीत. राहुल गांधी पाठोपाठ आज टीएमसी नेत्यांचं शिष्टमंडळ पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. कलेक्टरांची ऑर्डर आहे, असं सांगत नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्यापासून पोलिसांनी रोखलं होतं.