मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा रंगली होती. आज मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी ते म्हणाले की, मी सिरममध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी कोरोनाची लस घेतलेली नाही. सिरममध्ये जाऊन मी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ( R ट्रिपल BCG बूस्टर) लस घेतली. मी इम्युनिटी वाढविण्याची लस घेतल्याचे यावेळी पवारांनी सांगितले. त्यामुळे मी कोरोनाची लस घेतल्याचे लोक म्हणतात ते खरं नाही. त्याशिवाय माझ्या स्टाफनेही ही लस घेतल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. पवार हे कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या सिरममध्ये एकदा नाही तर दोन वेळा गेल्यामुळे उत्सुकता वाढली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज मात्र त्यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. पवार म्हणाले की, मी एकदा नाही तर दोन वेळा लस घेतली. मात्र जी तुम्हाला आणि लोकांना वाटते ती कोरोनाची लस नाही. तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची. मी इतकं लोकांमध्ये फिरतो..मिसळतो…प्रतिकारशक्ती वाढायला हवी म्हणून मी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतल्याचे ते म्हणाले. कोरोनाची लस यायला अजून जानेवारी उजाडेल असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
* हाथरसवरुन पवारांची नाराजी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडित मुलीच्या अंत्यसंस्काराला तिच्या नातेवाईकांनी उपस्थित राहू न दिल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशी घटना देशात कधीच घडली नसल्याचे ते यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला, टोकाची भूमिका घेतली, कायद्याला कवडीची किंमत दिली नाही.