अक्कलकोट : तालुक्यातील बोरगाव दे येथे मामा शिवराम मोतीराम गवळी सह दोघा भाच्याचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची पोलिसात आकस्मात म्हणून नोंद झाली आहे. जावळ कार्यक्रमास मामाच्या गावी आलेल्या दोन भाच्यासह मामा असे तिघाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील दे बोरगाव येथे समर्थ बंडोपंत धर्मशाळे. (वय १५ रा.माकणी ता लोहारा जिल्हा उस्मानाबाद) व युवराज सुनील छत्रबंद (वय ११ वर्षे रा.शेळगी, सोलापूर) हे दोघे जावळ कार्यक्रमानिमित्त बोरगाव दे येथे मामाच्या गावाला आले होते. घरात कार्यक्रम असल्यामुळे कपडे धुण्यासाठी सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुवून वाळण्यासाठी टाकले होते. मामा शिवराम मोतीराम गवळी (वय २५ रा बोरगांव दे.) यांनी कपडे घेऊन आणण्यास सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युवराज व समर्थ कपडे घेऊन येत असताना पाय घसरून विहिरीत पडले. आवाज आल्यावर मामा शिवराम यांनी विहिरीकडे धाव घेतले. दोघे भाचे बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी मामा शिवराम गवळी याने विहिरीत उडी मारली. दोघाना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिघेही विहिरीत बुडून मरण पावले.
घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतले व पंचनामा करून रात्री उशिरांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून नोंद झाली आहे.