कोल्हापूर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंदला पाठिंबा नसल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, ‘माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही, कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो. स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज दुखी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.